उंदराने डोळे कुरतडलेल्या Rajawadi Hospital मधील ‘त्या’ रुग्णाचा मृत्यू

मुस्तफा शेख

मुंबईच्या घाटकोपर परिसरातील राजावाडी रुग्णालयात ICU मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली होती. श्रीनिवास यलप्पा असं या रुग्णाचं नाव असून या रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी श्रीनिवास राजावाडी रुग्णालयात दाखल झाला होता. दम लागत असल्यामुळे श्रीनिवासच्या घरच्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. वैद्यकीय तपासणी केली असता श्रीनिवासला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबईच्या घाटकोपर परिसरातील राजावाडी रुग्णालयात ICU मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली होती. श्रीनिवास यलप्पा असं या रुग्णाचं नाव असून या रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे.

काही दिवसांपूर्वी श्रीनिवास राजावाडी रुग्णालयात दाखल झाला होता. दम लागत असल्यामुळे श्रीनिवासच्या घरच्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. वैद्यकीय तपासणी केली असता श्रीनिवासला लिव्हरचा प्रॉब्लेम असल्याचं समोर आलं होतं. ज्यानंतर त्याला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. श्रीनिवासच्या मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये.

परंतू या निमीत्ताने मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील स्वच्छतेचा मुद्दा प्रामुख्याने समोर आला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणाची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले होते. आज सकाळी राजावाडी रुग्णालयाच्या परिसरात साचलेला कचराही साफ करण्यात आला. परंतू ICU सारख्या ठिकाणी उंदराने प्रवेश करुन रुग्णाचा डोळा कुरतडल्यामुळे महापालिकेच्या कारभारावर स्थानिक स्तरातून संताप व्यक्त करण्यात येतो आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp