इराक, इराणप्रमाणे 2024 नंतर जनता लफंग्यांना रस्त्यावर उतरून मारेल: संजय राऊत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Sanjay Raut Angry on BJP नवी दिल्ली: लिबिया, इराण आणि इराकमध्ये ज्या पद्धतीने जनेतेने हुकूमशाही असलेल्या लोकांना जनतेने रस्त्यावर उतरून मारलं होतं तसंच 2024 नंतर या लफंग्यांना जनता रस्त्यावर उतरून मारेल. असं वक्तव्य करत शिवसेना (Shiv Sena) UBT पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सदानंद कदम (Sadanand Kadam) आणि हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर करण्यात आलेल्या ईडी (ED) कारवाईवर संताप व्यक्त केला. (people will kill authoritarian tendencies on the streets after 2024 like iraq iran sanjay raut angry on bjp)

ADVERTISEMENT

‘हे सगळे लफंगे आहेत.. 2024 नंतर या लफंग्यांना जनता रस्त्यावर पकडून मारेल. अनेक देशात, जगात अशा घटना घडल्या आहेत. अशा प्रकारच्या लोकांना.. लिबिया असेल, इराक असेल.. इराण असेल.. इथे अशाप्रकारच्या लोकांना जनतेने धरून मारलं आहे.. अशा प्रकारच्या हुकूमशाही असलेल्या लोकांना.’ अशा शब्दात राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली.

‘एक गद्दार खासदार जनतेचा मार खाता-खाता वाचला’

‘मी काल स्वत: ठाण्यात होतो. शिवजयंतीच्या एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. मी जे चित्र ठाण्यात पाहिलं ते म्हणजे.. बाळासाहेबांनी जी शिवसेना ठाण्यात रुजवली, वाढवली. त्या चित्रात मला कुठेही बदल दिसला नाही. त्यात कोणी म्हणत असेल की, आम्हीच ठाण्याचे राजे.. नाही शिवसेना.. भले तुम्हाला निवडणूक आयोगाने काही मजकूर खरडून दिला असेल.. म्हणून शिवसेना तुमची होत नाही. ठाण्यातील शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठामपणे आहे.’

हे वाचलं का?

‘मुख्यमंत्र्यांच्या सभेत काय झालं मला माहित नाही. पण भविष्यात अशाप्रकारच्या प्रसंगांना सामोरं जावं लागेल. इचलकरंजीमध्ये एक गद्दार खासदार जनतेचा मार खाता-खाता वाचला. जनतेने त्यांची गाडी अडवली, त्यांच्याविरोधात घोषणा दिल्या. त्यांच्या अंगावर जनता गेली. म्हणजे मला तर वाटत होतं की, जनता आता याला पकडून मारतेय की काय रस्त्यात पकडून.. ही चीड लोकांच्या मनात आहे.’ असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

Exclusive: संजय राऊतांच्या बोलण्यात का वाढलीय शिवीगाळ?, राऊत म्हणाले..

ADVERTISEMENT

‘तो मुलुंडचा पोपटलाल जाहीर करतो की…’

‘या कारवाया राजकीय सूडबुद्धीने सुरू आहेत. हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाचं नेतृत्व आहे. सदानंद कदम यांना काल अटक केली. त्यांना अटक होणार, अटक होणार असं ते आमचे मुलुंडचे पोपटलाल बोलत होते. सदानंद कदम यांना अटक करण्याचं कारण काय? ज्या एका प्रकरणाची चौकशी दीड वर्षांपासून सुरू आहे. जो तथाकथित रिसॉर्ट आहे जो अद्याप सुरू झालेला नाही. त्या रिसॉर्टमधून दूषित पाणी कुठे तरी जातंय.. हा काय ईडीचा विषय झाला? पण खेडची उद्धव ठाकरेंची सभा यशस्वी होण्यामागे जी असंख्य प्रमुख लोकं मेहनत घेत होते. त्यात सदानंद कदम होते. या एका कारणासाठी काल ईडीचे अधिकारी खेडला गेले आणि सदानंद कदम यांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना अटक करण्याची बातमी ईडीने देण्याआधी तो मुलुंडचा पोपटलाल जाहीर करतो की, त्यांना अटक झाली… याचा अर्थ काय?’, असं म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्यांवर टीका केली.

ADVERTISEMENT

‘हसन मुश्रीफांचा एफआयआर सगळ्यात आधी त्या माणसाला मिळतो. त्यावर हायकोर्ट प्रश्न उपस्थित करून चौकशीचे आदेश दिले आहेत. या महाराष्ट्रात काय चाललंय? आज लालू प्रसाद यादव यांच्या घरावर देखील धाडी पडल्या. लालू यादव हे नुकतेच एका गंभीर आजारातून बरे होत आहेत. त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांची 16-16 तास चौकशी सुरू आहे. महाराष्ट्रात देखील हेच सुरू आहे. आम्ही अनेक वर्ष सांगतो आहोत या किरीट सोमय्याच्या विक्रांत घोटाळ्याची चौकशी करा. त्याला तुम्ही क्लिन चीट देता.’ असंही राऊत म्हणाले.

‘अंधभक्तांनो, हे कधी थांबणार?’, संजय राऊतांचा थेट मोदी-शाहांवर प्रहार

काहीही झालं तरी भाजपसमोर गुडघे टेकणार नाही…

‘मी भविष्यात काही कारखान्यांची यादी फडणवीसांना पाठवणार आहे. त्यासंदर्भात सुद्धा ईडी चौकशी करणार आहे का? पण फक्त महाराष्ट्रात महाविकास आघाडी ज्या गतीने पुढे जात आहे.. विशेषत: कसबा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात जे वातावरण निर्माण झालं आहे त्याला कुठे तरी खिळ घालण्यासाठी ईडीच्या कारवाया सुरू झाल्या आहेत. सगळ्या कारवाया खोट्या, बोगस आणि भंपक आहेत.’

अनिल देशमुख, संजय राऊत यांच्या प्रकरणात कोर्टाने तेच सांगितलं आहे. नवाब मलिक प्रकरणात देखील त्यांचा बुरखा फाटेल. सदानंद कदम यांचं प्रकरणच नाही अशी माझी माहिती आहे. फक्त शिवसेनेच्या लोकांना त्रास द्यायचा. जे विरोधात बोलतात त्यांच्या विरुद्ध ईडी-सीबीआयचा वापर सुरू आहे. या देशातील प्रमुख नऊ नेत्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं. की, कशाप्रकारे ईडी आणि सीबीआयचा गैरवापर सुरू आहे. त्या पत्रावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सह्या आहेत. त्यानंतरही मनमानी पद्धतीने कारवाया सुरुच आहे. पण काहीही झालं तरी आम्ही गुडघे टेकणार नाही. पण सत्तेचा कोणी अमरपट्टा घेऊन आलेलं नाही.’ असं म्हणत संजय राऊत यांनी आपण यापुढेही सत्ताधारी भाजपसोबत लढणार असल्याचं म्हटलं आहे.

शिवसेना: ‘BJP फक्त तुमचा..’ ठाण्यातील राड्यानंतर संजय राऊत संतापले

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT