मुंबईत पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर, सलग 12व्या दिवशी दरवाढ
मुंबई: जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर स्थिर असूनही देशातील किंमत सातत्याने वाढत आहे. आज (शनिवार) सलग 12 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. जाणून घ्या आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किती झालीए वाढ आज पट्रोलचे 37 पैसे तर डिझेल हे 39 पैशांनी महागलं आहे. मुंबईत पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर मुंबईत आज […]
ADVERTISEMENT

मुंबई: जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर स्थिर असूनही देशातील किंमत सातत्याने वाढत आहे. आज (शनिवार) सलग 12 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. जाणून घ्या आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किती झालीए वाढ आज पट्रोलचे 37 पैसे तर डिझेल हे 39 पैशांनी महागलं आहे.
मुंबईत पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर
मुंबईत आज पेट्रोल 37 पैशांनी महागलं असून आज पट्रोलचे दर हे 37 पैसे आणि डिझेल 39 पैशांनी महागलं आहे. 96.94 प्रति लीटरवर जाऊन पोहचलं आहे. तर डिझेल 39 पैशांनी महागल्याने 88.01 रुपये प्रति लीटर एवढं झालं आहे. दरम्यान, मुंबईत काल (19 फेब्रुवारी) पेट्रोलचे दर हे 96.57 रुपये प्रति लिटर इतके होते. तर डिझेलचे दर हे 87.62 रुपये प्रति लिटर होते.
दुसरीकडे पुण्यात पॉवर पेट्रोलने शंभरी देखील गाठली आहे. याशिवाय साध्या पेट्रोलचे दर हे 96.62 रुपये आणि डिझेल 86.36 रुपये एवढं आहे.