समजून घ्या : पेट्रोल-डिझेलच्या किंमती का वाढतच राहणार?
पेट्रोल शंभरीपार गेलंय, डिझेलही शंभरीच्या घरात गेलंय…एवढंच नाही तर आपल्या घरात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीची किंमतही आता आपल्या आवाक्याबाहेर जात चालली आहे. या किंमती वाढण्याचं एक कारण आपल्याला माहितेय ते म्हणजे टॅक्स…पण याशिवाय आणखी एक कारण आहे. दोन देशांमध्ये वाद सुरू आहे, ज्यामुळे भारतातील प्रत्येक सामान्य नागरिकालाही महागाईची झळ बसतेय…नेमकं हे प्रकरण काय आहे आज समजून […]
ADVERTISEMENT

पेट्रोल शंभरीपार गेलंय, डिझेलही शंभरीच्या घरात गेलंय…एवढंच नाही तर आपल्या घरात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीची किंमतही आता आपल्या आवाक्याबाहेर जात चालली आहे. या किंमती वाढण्याचं एक कारण आपल्याला माहितेय ते म्हणजे टॅक्स…पण याशिवाय आणखी एक कारण आहे. दोन देशांमध्ये वाद सुरू आहे, ज्यामुळे भारतातील प्रत्येक सामान्य नागरिकालाही महागाईची झळ बसतेय…नेमकं हे प्रकरण काय आहे आज समजून घेऊयात…
मे 2021 पासून आतापर्यंत 35 वेळा पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढलेल्या आहेत. म्हणजेच मे महिना ते जुलैपर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किंमती 7 ते 8 रूपयांनी वाढल्यात. परिणामी आता देशातील 13 राज्य आणि केद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोल हे शंभरीच्याही वर गेलंय…मुंबईचंच उदाहरण पाहिलं तर मुंबईत पेट्रोल हे 105 रूपयांना मिळतंय…शिवाय डिझेलच्याही किंमती आता बहुतांश ठिकाणी 90 रूपयांच्या वर आहेत.
ऑईल मार्केटिंग कंपन्याही हे दर स्थिर करायचं नाव घेत नाहीयेत…त्यामुळे कंपन्या-रिटेलर्स आणि सरकारकडून आपल्याला काही दिलासा मिळू शकेल का? तर त्याचं उत्तर तूर्तास तरी नाही असं आहे. मग आता पर्याय काय? आंतरराष्ट्रीय बाजारात तरी कच्च्या तेलाच्या किंमती कमी होऊन आपल्याला दिलासा मिळू शकतो का?
तर यासाठी गेल्या काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरासंदर्भात घडलेल्या घडामोडींकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं.