Praniti Shinde: Corona च्या दुसऱ्या लाटेतील मृत्यूस केवळ पंतप्रधान मोदी जबाबदार, प्रणिती शिंदेंची घणाघाती टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विजयकुमार बाबर, सोलापूर

ADVERTISEMENT

‘कोरोनाची दुसरी लाट आणि त्यामध्ये झालेले मृत्यू याला फक्त आणि फक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत.’ अशी घणाघाती टीका काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

कोरोना संकट काळात मोदी सरकार योग्य पद्धतीने नियोजन करु शकलं नाही आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला असा आरोप यावेळी प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

हे वाचलं का?

पाहा प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या:

‘कोरोनाची जी दुसरी लाट आली आणि त्यामध्ये जे मृत्यू झाले आहेत. त्यासाठी केवळ आणि केवळ देशाचे पंतप्रधान जबाबदार आहेत. कारण पहिल्या लॉकडाऊनचा वापर हा बेड्स, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन यासाठी केला गेला पाहिजे होता. पण पंतप्रधानांकडून तो केला गेला नाही. म्हणून दुसऱ्या लाटेत एवढी लोकं दगावली. त्यामुळे केवळ तेच यासाठी जबाबदार आहेत.’ अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली.

ADVERTISEMENT

‘ऐन लॉकडाऊनमध्ये सरकारने जीवनावश्यक वस्तू महाग केल्या’

ADVERTISEMENT

याचवेळी त्यांनी वाढत्या महागाईवरुन देखील केंद्र सरकावर टीका केली. ‘भाजपचे नगरसेवक असोत की, पंतप्रधान लोक त्यांच्यावर वैतागले आहेत. सिलेंडर, तेल, पेट्रोल-डिझेल यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती देखील प्रचंड महाग झाल्या आहेत.’

‘ऐन लॉकडाऊनमध्ये तुम्ही गरजेच्या वस्तूंमध्ये भाववाढ करता. या सगळ्या गोष्टी सामान्य लोकांना झळ पोहचविणाऱ्या गोष्टी आहेत.’ असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली.’

सोलापूर महापालिका निवडणूक आघाडीमध्ये लढवणार?

दरम्यान, येत्या 7-8 महिन्यामध्ये सोलापूर महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. अशावेळी इथे काँग्रेस महाविकास आघाडीच्या साथीने लढणार का? असा सवाल प्रणिती शिंदेना विचारण्यात आला.

यावर बोलताना त्या असं म्हणाल्या की, ‘निवडणुकीवेळेस नेमकं कसं लढणार हा स्थानिक पातळीवरचा प्रश्न आहे. तोपर्यंत गणितं काय असेल त्यावर सगळं अवलंबून असेल.’

प्रणिती शिंदेंचा भाजपवर निशाणा, नेमकं काय म्हणाल्या काँग्रेस आमदार?

‘पण सध्या काही महत्त्वाचे प्रश्न आमच्यासमोर आहेत. उजनी धरणात पाणी असूनही आज सोलापूरला सहा दिवसातून एकदाच पाणी मिळत आहे. पण जेव्हा इथे काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा आम्ही काहीही करुन सोलापूरला दोन दिवसातून पाणी पुरवण्याचा प्रयत्न करत होतो.’

‘त्यामुळे आता हे सगळे प्रश्न आम्ही लोकांपुढे घेऊन जाऊ आणि त्याच मुद्द्यांवर निवडणूक लढवू.’ असं प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, आगामी काळात सोलापूरमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असाच सामना रंगण्याची दाट शक्यता आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT