लाइव्ह

PM Modi Live : “…म्हणून आपण महात्मा फुले-सावित्रीबाई फुलेंची आठवण करतो”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

  • 01:49 PM • 12 Jan 2024

    महात्मा फुले-सावित्रीबाई फुलेंची मोदींनी का काढली आठवण?

    मोदी म्हणाले, "आज आपण विरांची भूमी महाराष्ट्रात आहोत. आजही आपण सगळे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंची आठवण यासाठी करतो, कारण त्यांनी शिक्षणाला सामाजिक सशक्तीकरणाचं माध्यम बनवलं. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात सर्व महान नेत्यांनी देशासाठी काम केले. ते जगले, लढले, त्यांनी स्वप्न बघितली, संकल्प हे सगळे देशासाठी केले. त्यांनी देशाला नवी दिशा दाखवली. अमृताकाळाच्या कालखंडात ती जबाबदारी माझ्या युवा सहकाऱ्यांच्या खांद्यावर आहे. तुम्ही असं काम करा की, पुढच्या शतकात ती पिढी तुमचं नाव घेईल. तुमची आठवण काढेल. मी तुम्हाला २१ व्या शतकातील सर्वात भाग्यवान पिढी मानतो. भारतातील तरुणाई हे करू शकते. माझ्या सगळ्यात जास्त विश्वास भारतातील युवा पिढीवर आहे", असा संदेश मोदींनी राष्ट्रीय युवा महोत्सवात दिला.
  • 01:39 PM • 12 Jan 2024

    पंतप्रधान मोदींचं नाशिकमध्ये भाषण

    भारताच्या अर्थव्यवस्थेत तरुणांचं योगदान मोठं -मोदीमी सांगितलं होतं की आपण सगळ्या तीर्थक्षेत्रांची, मंदिरांची स्वच्छता करावी. आज मला काळाराम मंदिर परिसरात स्वच्छता करण्याची संधी मिळाली.
  • 12:54 PM • 12 Jan 2024

    ठाकरे कोर्टात जाणार, शिंदेंसमोरील अडचणी वाढणार!

    केंद्रीय निवडणूक आयोगानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेतील फुटीवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला. असं असलं तरी अध्यक्षांच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन होणार आहे. त्यामुळेच शिंदे यांच्यावरील आमदार अपात्रतेची टांगती तलवार अद्यापही कायम आहे. शिंदे यांना पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागणार आहे. (Uddhav Thackeray will challenge Shiv Sena Mla Disqualification verdict in Supreme Court)
  • 11:04 AM • 12 Jan 2024

    नाशिकमध्ये भाजपचं शक्तिप्रदर्शन! मोदींचा रोड शो सुरू

    पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा रोड शो झाला.
  • ADVERTISEMENT

  • 10:49 AM • 12 Jan 2024

    पंतप्रधानांना वेळ मिळाला कारण, कोणत्याही क्षणी...; संजय राऊतांचं टीकास्त्र

    पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते नाशिक येथील काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. या दौऱ्याबद्दल बोलताना संजय राऊतांनी भाजप आणि मोदींना खडेबोल सुनावले.
  • 08:37 AM • 12 Jan 2024

    नवी मुंबईत मोदींच्या हस्ते या प्रकल्पांचं होणार उद्घाटन

    नवी मुंबई येथे होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान 12,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करणार आहेत.
  • ADVERTISEMENT

  • 08:30 AM • 12 Jan 2024

    काय आहे अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू?

    मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) बांधण्यात आला असून त्याचे नाव आता 'अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू करण्यात आले आहे. या पुलाची पायाभरणीदेखील पंतप्रधानांच्याच हस्ते डिसेंबर 2016 मध्ये झाली होती.
  • 08:30 AM • 12 Jan 2024

    पंतप्रधान मोदींचा असा आहे महाराष्ट्र दौरा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 12 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12:15 च्या सुमाराला नाशिक येथे आगमन होणार असून, येथे ते 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान दुपारी साडेतीनच्या सुमारास मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन करणार असून प्रवाससुद्धा करणार आहेत.
  • 08:30 AM • 12 Jan 2024

    पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यात काय काय?

    - अटल बिहारी वाजपेयी शिवडी - न्हावा शेवा अटल सेतूचे पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत. सुमारे 17,840 कोटी रुपये खर्चाचा अटल सेतू हा देशातील सर्वात लांब पूल, तसेच सर्वात लांब सागरी पूलदेखील आहे.
follow whatsapp

ADVERTISEMENT