सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्थान फक्त इतिहासात नाही तर भारतीयांच्या हृदयात-मोदी
आज सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या कार्यक्रमात व्हीडिओ संदेशाद्वारे देशाशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आज अवघा देश वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहतो आहे. सरदार पटेल हे फक्त इतिहासात नाहीत तर त्यांचं स्थान प्रत्येक भारतीयांच्या मनामनात आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं […]
ADVERTISEMENT

आज सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या कार्यक्रमात व्हीडिओ संदेशाद्वारे देशाशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आज अवघा देश वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहतो आहे. सरदार पटेल हे फक्त इतिहासात नाहीत तर त्यांचं स्थान प्रत्येक भारतीयांच्या मनामनात आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
आज राष्ट्रीय एकता दिवस आहे त्यानिमित्त सगळ्या देशवासीयांनाही मी शुभेच्छा देतो असंही मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातो आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या नवनिर्माणाचा प्रयत्न करत आहेत. सरदार पटेल यांचा देशाकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा एखाद्या शरीराकडे पाहण्याचा होता. त्यांच्यासाठी भारताचा अर्थ विकासनशील भारत होता. प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार हे त्यांचं स्वप्न होतं असंही मोदी म्हणाले.
आणखी काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘सरदार पटेल हे कायम हाच विचार करत होते की भारत सशक्त असला पाहिजे, सर्वसमावेश असला पाहिजे. संवेदनशील आणि सतर्कही असला पाहिजे. विनम्र आणि विकसित असला पाहिजे. स्वतंत्र भारताच्या निर्मितीमध्ये मोठं योगदान सरदार पटेल यांचं होतं. त्यांच्या प्रेरणामळेच भारत आज अनेक आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज झाला आहे. अशा नायकाला अवघा देश आदरांजली वाहतो आहे.’










