PM Narendra Modi US Visit: PM मोदी अमेरिकेला रवाना, अमेरिकत कोणाकोणाला भेटणार?
नवी दिल्ली: पंतप्रधाननरेंद्र मोदी हे आज (22 सप्टेंबर) अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. आपल्या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान मोदी 24 सप्टेंबरला व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीत सहभागी होतील. या बैठकीला अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस देखील उपस्थित राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यातील ही दुसरी भेट असणार आहे. जेव्हा जो बायडेन हे […]
ADVERTISEMENT
नवी दिल्ली: पंतप्रधाननरेंद्र मोदी हे आज (22 सप्टेंबर) अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. आपल्या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान मोदी 24 सप्टेंबरला व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीत सहभागी होतील. या बैठकीला अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस देखील उपस्थित राहतील.
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यातील ही दुसरी भेट असणार आहे. जेव्हा जो बायडेन हे बराक ओबामा यांच्या मंत्रिमंडळात उपराष्ट्राध्यक्ष होते तेव्हा एकदा पंतप्रधान मोदी आणि त्यांची भेट झाली होती.
अमेरिका दौऱ्यादरम्यान द्विपक्षीय बैठकी व्यतिरिक्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील इतर काही बैठकींमध्ये देखील सहभागी होणार आहेत. या व्यतिरिक्त, पीएम मोदी व्यावसायिक संवाद आणि संयुक्त राष्ट्र महासभेलाही संबोधित करतील. या दौऱ्यात त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ असणार आहे. पंतप्रधान मोदींचा हा अमेरिका दौरा 26 सप्टेंबर रोजी संपणार आहे.
हे वाचलं का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेतील वेळापत्रक व्यस्त असेल. अनेक नेत्यांच्या भेटीगाठी तसेच व्यावसायिक बैठकीतही ते सहभागी होणार आहेत. जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याचे वेळापत्रक कसं असेल.
पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा
ADVERTISEMENT
– 22 सप्टेंबर (भारतात 23 सप्टेंबर): संध्याकाळी वॉशिंग्टन डीसीमध्ये राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या द्वारे आयोजित केलेल्या कोविड -19 ग्लोबल समिटमध्ये पंतप्रधान मोदी सहभागी होतील
ADVERTISEMENT
– 23 सप्टेंबर: व्हाईट हाऊसमध्ये उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यासोबत बैठक. दोन्ही नेत्यांची ही पहिली औपचारिक बैठक असेल.
देशातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेतील काही मोठ्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. त्यात अॅपलचे CEO टीम कूक यांचाही समावेश असेल.
तसेच ऑस्ट्रेलिया, जपान आणि ईव्ह बिजनेस बैठकीला देखील पंतप्रधान उपस्थित राहतील. पंतप्रधान मोदी यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांच्यासोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत.
– 24 सप्टेंबर: सकाळी पंतप्रधान मोदी द्विपक्षीय बैठक आणि क्वाड समिटमध्ये (Quad Summit) सहभागी होतील.
-25 सप्टेंबर: यूएन जनरल असेंब्ली (UNGA) च्या 76 व्या सत्रात पंतप्रधान मोदींचे भाषण स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 वाजता (IST संध्याकाळी 6:30 वाजता) होणार आहे.
Modi On Taliban : दहशतीच्या बळावर साम्राज्य उभं करणारी वृत्ती फार काळ टिकत नाही -मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या या दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याबरोबर तीन परिषदांमध्ये सहभागी होतील. बायडेन यांनी कोरोनासंबंधित आयोजित केलेल्या जागतिक बैठकीला पंतप्रधान मोदी उपस्थित राहतील. याशिवाय द्विपक्षीय बैठकीत बायडेन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात चर्चा केली जाईल. त्याचबरोबर ग्लोबल पार्टनरशीपला प्रोत्साहन देणे, व्यापार, संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य, दहशतवाद आणि अफगाणिस्तान यासारख्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT