संदीप देशपांडे हल्ला: दोघांना भांडूपमधून घेतलं ताब्यात, नेमकं कनेक्शन काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काल (3 मार्च) चार हल्लेखोरांकडून स्टम्पने दादरच्या शिवाजी पार्क परिसरात हल्ला करण्यात आला होता. आता याच हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (Crime Baranch) दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे ते दोनही आरोपी हे भांडूपमधील असल्याचं समजतं आहे. ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या पोलीस दोन्ही आरोपींची चौकशी करत असून इतर दोन संशयितांचा शोध घेत आहेत. (police arrested two persons who were attacked by mns leader sandeep deshpande from bhandup)

ADVERTISEMENT

संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना तात्काळ हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी काही पथकं तैनात केली असून त्यांनी शिवाजी पार्क परिसरातील काही सीसीटीव्ही फुटेज तपासून दोन हल्लेखोरांची ओळख पटवत त्यांचा शोध घेतला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन हल्लेखोरांना भांडूपमधून ताब्यात घेतलं. हल्लेखोरांनी हा हल्ला नेमका कोण्याच्या सांगण्यावरून केला? किंवा या हल्ल्यामागचा नेमका हेतू काय याची पोलीस चौकशी करत आहेत.

दरम्यान, काल पोलिसांना दिलेल्या जबाबात संदीप देशपांडे यांनी थेट शिवसेना (UBT)चे नेते वरुण सरदेसाईंवर आरोप केला आहे. आपण मुंबई महापालिकेतील घोटाळे उघड करत असल्यानेच वरुण सरदेसाई यांच्यावर सांगण्यावरून हल्ला झाल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी यावेळी आहे.

हे वाचलं का?

याच सगळ्याबाबत संदीप देशपांडे हे आज (4 मार्च) पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते त्यांच्यावर नेमका हल्ला कोणी आणि का केला याबाबत भाष्य करण्याची शक्यता आहे. तसेच या हल्ल्यामागे काही राजकीय हेतू आहे का? याबाबतंही ते काही महत्त्वाचं वक्तव्य करू शकतात. त्यामुळेच संदीप देशपांडेंच्या या पत्रकार परिषदेचं सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Mumbai: मोठी बातमी… मनसे नेते संदीप देशपांडेंवर प्राणघातक हल्ला

ADVERTISEMENT

नेमकं प्रकरण काय?

संदीप देशपांडे हे 3 मार्च रोजी नेहमीप्रमाणे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकला गेलेले असताना चार अज्ञात हल्लेखोरांनी जे तोंडावर मास्क लावून आले होते त्यांनी अचानक स्टम्पने देशपांडेंवर हल्ला केला होता. या हल्ल्यात देशपांडेंच्या हात आणि पायाला दुखापत झाली होती. हल्लोखोरांकडून गंभीर दुखापत पोहचवण्याचा हेतू होता. मात्र, सुदैवाने या हल्ल्यात गंभीर जखमी झालो नाही. असा दावा देशपांडेंनी केला होता.

ADVERTISEMENT

Raj Thackeray: राज ठाकरे प्रचंड संतापले, मनसे नेत्यांना दमच भरला; म्हणाले…

संदीप देशपांडेंवर हल्ला होताच येथील अनेक नागरिक त्यांच्या बचावासाठी पुढे सरसावले होते. त्यामुळे चारही हल्लेखोरांनी लागलीच येथून पळ काढलेला.

शिवाजी पार्क हा संपूर्ण भाग सकाळच्या सुमारास प्रचंड वर्दळीचा असतो. येथे मोठ्या प्रमाणात लोकं मैदानावर खेळण्यासाठी आणि मॉर्निंग वॉकसाठी येत असतात. असं असतानाही हल्लेखोरांनी देशपांडेंवर एवढ्या खुलेपणाने हल्ला झाल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली होती.

“मनसे अध्यक्ष म्हणजे ‘ओके’ साबण”, राज ठाकरेंना काँग्रेसनं डिवचलं, व्हिडीओच लावला

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT