Pradeep Sharma: पोलीस अधिकारी ते शिवसेना नेता… कोण आहेत प्रदीप शर्मा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: अँटेलिया संशयित कार आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणी निवृत्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना आज (17 जून) NIA ने अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील आता ही सर्वात मोठी अटक मानली जात आहे. याआधी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) याला अटक करण्यात आली होती. पण कधीकाळी त्याचे बॉस असणाऱ्या प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आल्याने आता या प्रकरणाला पुन्हा एकदा नवीन प्रकरण मिळालं आहे.

सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा ही जोडगोळी गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांसोबत होती. सुरुवातीच्याच काळापासून पोलीस दलात एकत्र असलेल्या या दोघांनी आतापर्यंत अनेक एन्काउंटर (Encounter) केले आहेत.

अशावेळी आता स्फोटकं आणि हत्येप्रकरणात अटक (arrest) करण्यात आलेल्या प्रदीप शर्मा यांची आजवरची नेमकी कारकीर्द कशी आहे याबाबत आपण जाणून घेऊयात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रदीप शर्मा यांची आतापर्यंतची कारकीर्द

प्रदीप शर्मा हे मूळचे उत्तर प्रदेशमधील असले तरी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे महाराष्ट्रातच गेलं आहे. त्यांच्या लहानपणीच त्यांचे वडील हे धुळ्यात स्थायिक झाले होते. त्यामुळे प्रदीप शर्मा यांचं प्राथमिक शिक्षण देखील इथेच झालं होतं.

पुढे त्यांनी विज्ञान शाखेतून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आणि नंतर त्यांनी Msc देखील पूर्ण केलं. यानंतर एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन ते पोलीस सेवेत दाखल झाले.

ADVERTISEMENT

Pradeep Sharma: मोठी बातमी… एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक

ADVERTISEMENT

1983 साली पोलीस दलात दाखल

प्रदीप शर्मा हे 1983 साली पोलीस दलात दाखल झाले होते. सुरुवातीला त्यांचं ट्रेनिंग हे नाशिकच्या पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये झालं होतं. यावेळी त्यांच्यासोबत विजय साळसकर, रवींद्र आंग्रे, प्रफुल्ल भोसले असे दिग्गज पोलीस अधिकारी यावेळी प्रदीप शर्मा यांच्यासोबत होते.

दरम्यान, आपलं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रदीप शर्मा यांना पहिलचं पोस्टिंग मुंबईत मिळालं होतं. सुरुवातीच्या काळात त्यांनी धडाकेबाज कामगिरी करत अंडरवर्ल्डमधील अनेक गुडांचा खात्मा केला होता.

एन्काउंटर स्पेशालिस्ट…

आतापर्यंत त्यांच्या नावावर 113 एन्काऊंटर आहेत. यामुळेच पोलीस दलात त्यांना एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणूनही ओळखलं जायचं. मात्र 2009 साली त्यांना लखनभैय्या बनावट एन्काऊंटर प्रकरणी अटक करण्यात आली होती. याप्रकरणात त्यांना तब्बल 4 वर्ष तुरुंगाची हवा खावी लागली होती. दरम्यान, 2013 साली त्यांची तुरुंगातून सुटका झाली होती. त्यानंतर ते पुन्हा एकदा पोलीस दलात दाखल झाले होते.

Antilia bomb scare Case: मोठी बातमी… एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर NIA चा छापा

पुन्हा एकदा पोलीस दलात…

शर्मा यांचं शेवटचं पोस्टिंग ठाण्यातील खंडणी विरोधी विभागात होतं. त्यावेळी ठाण्याचे आयुक्त परमबीर सिंग होते. 2017 साली त्यांनी खंडणी प्रकरणात दाऊदचा भाऊ एक्बाल कासकर याला देखील अटक केली होती.

Antilia Case: आता NIA कडून वाझेंचे एकेकाळचे बॉस प्रदीप शर्मांची चौकशी सुरू

…अन् प्रदीप शर्मांनी शिवसेनेचा झेंडा घेतला हाती!

दरम्यान, आपल्या नोकरीचे आठ महिने शिल्लक असताना प्रदीप शर्मा यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन राजकारणात प्रवेश केला होता. 2019 साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत नालासोपारा मतदार संघातून क्षितीज ठाकूर यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. पण त्यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता.

90 च्या दशकात प्रदीप शर्मा हे सचिन वाझेंचें बॉस होते. सुरुवातीला प्रदीप शर्मा यांच्या कामगिरीचं बरंच कौतुक झालं होतं. मात्र, नंतरच्या काळात एन्काउंटर प्रकरणी त्यांच्यावर गंभीर आरोप देखील झाले होते. त्यामुळेच त्यांच्या कारकीर्दीला डाग लागले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT