सेक्स आणि हस्तमैथुनावर पोप फ्रान्सिस यांचं मोठं विधान; सर्वत्र चर्चा
डॉक्युमेंटरीमध्ये, पोपला एलजीबीटी अधिकार, गर्भपात, पॉर्न उद्योग, लिंग, धर्म आणि कॅथोलिक चर्चमधील लैंगिक शोषण यासह विविध विषयांवर प्रश्न विचारण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT

Pop Frances on sex and masturbation : पोप फ्रान्सिस यांनी बुधवारी प्रसिद्ध झालेल्या माहितीपटात सेक्सच्या सद्गुणांची प्रशंसा केली असून, ‘देवाने मानवाला दिलेल्या सर्वात सुंदर गोष्टींपैकी एक’ असे वर्णन केले आहे. पोप यांनी हस्तमैथुनाबद्दलही सांगितले की सेक्स व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीमुळे सेक्सची समृद्धता कमी होते. (Pope’s big statement on sex and masturbation; There is a discussion)
Same Sex Marriage : समलैंगिक विवाहाच्या मान्यतेस केंद्राने दर्शवला विरोध
‘द पोप आन्सर्स’ या डिस्ने प्रोडक्शनच्या माहितीपटात पोपने या गोष्टी सांगितल्या आहेत. गेल्या वर्षी, पोपने 20 वर्षांच्या 10 तरुणांशी संवाद साधला आणि हा माहितीपट त्या संभाषणांवर आधारित आहे. डॉक्युमेंटरीमध्ये, पोपला एलजीबीटी अधिकार, गर्भपात, पॉर्न उद्योग, लिंग, धर्म आणि कॅथोलिक चर्चमधील लैंगिक शोषण यासह विविध विषयांवर प्रश्न विचारण्यात आले आहेत.
सेक्स आणि हस्तमैथुन यावर पोपचे मत
डॉक्युमेंट्रीमध्ये सेक्सच्या प्रश्नावर ते म्हणतायेत, ‘देवाने माणसाला दिलेल्या सुंदर गोष्टींपैकी सेक्स ही एक आहे.’ हस्तमैथुनाचा संदर्भ देताना ते म्हणाले, ‘समृद्धी म्हणजे स्वत:ला लैंगिकरित्या अभिव्यक्त करणे, त्यामुळे खऱ्या लैंगिक अभिव्यक्तीपासून विचलित होणारी कोणतीही गोष्ट तुम्हाला आणि सेक्सची समृद्धता कमी करते.’