हिरेन यांच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टशी छेडछाड – आशिष शेलारांचा आरोप
मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीचं प्रकरण सध्या गाजतंय, NIA चे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर महाराष्ट्र एटीएसकडून हा तपास NIA ला वर्ग करण्यात आला. विरोधीपक्षातील भाजप अजुनही हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात सत्ताधारी पक्षात असलेल्या शिवसेनेला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न करतोय. भाजप आमदार आशिष शेलार […]
ADVERTISEMENT

मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीचं प्रकरण सध्या गाजतंय, NIA चे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर महाराष्ट्र एटीएसकडून हा तपास NIA ला वर्ग करण्यात आला. विरोधीपक्षातील भाजप अजुनही हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात सत्ताधारी पक्षात असलेल्या शिवसेनेला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न करतोय. भाजप आमदार आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत, हिरेन यांच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टशी छेडछाड करण्यात आल्याचा आरोप केला.
५ मार्च रोजी मुंब्रा खाडी परिसरात हिरेन यांचा मृतदेह सापडला होता. यावेळी हिरेन यांच्या गळ्याभोवती रुमाल आढळले होते. प्राथमिक तपासात हिरेन यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात होतं…परंतू यानंतर या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं. परंतू हिरेन यांच्या गळ्याभोवत रुमाल सापडल्याची बाब पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये नमुद का नाही असा सवाल शेलार यांनी विचारला. “पोस्टमार्टेम होत असताना त्याचं पूर्णपणे चित्रीकरण करण्यात आलं नाही, त्यावेळी फक्त ७-८ मिनीटांचं चित्रीकरण करण्यात आलं. ज्यामुळे पुरेसे पुरावे मिळू शकले नाहीत. या घटनेचं चित्रीकरण पूर्णपणे का करण्यात आलं नाही याचाही तपास NIA ने करायला हवा. यामागे कोणत्या अधिकाऱ्याचा किंवा मंत्र्यांचा दबाव होता याचाही तपास व्हायला हवा,” असं शेलार म्हणाले.
मनसुख हिरेन यांचा मृतदेह ताब्यात आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण जाहीर करण्यात आलं नव्हतं. “ हिरेन यांच्या मृतदेहावर गरज नसातानाही Diatom tests करण्यात आली. मुंबईतील कलीना येथील फॉरेन्सिक लॅबनेही अशा प्रकारे Diatom tests करण्यासाठी परवानगी नसल्याचं म्हटलं होतं. यानंतर या प्रकरणातले अहवाल जे.जे.हॉस्पिटलमध्ये मान्यता नसलेल्या लॅबला पाठवण्यात आले. कोणाच्या सांगण्यावरुन हे अहवाल जे.जे. रुग्णालयातील लॅबमध्ये पाठवण्यात आले, असा सवाल शेलार यांनी विचारला. NIA ने जर मला विचारलं तर मी त्या मंत्र्यांचं नाव घेईन असंही शेलार म्हणाले.
मनसुखची हत्या करण्यासाठी आधी क्लोरोफॉर्मचा वापर?
