Letter Bomb: प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंशी खासगीत बोलायला हवं होतं-भुजबळ

मुंबई तक

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांना जो त्रास होतो आहे त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी खासगीत बोलायला हवं होतं. ईडी, आणि इतर यंत्रणांच्या त्रासामुळेच प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब पडला आहे. शरद पवार, एकनाथ खडसे आणि मलाही या ED आणि यंत्रणांनी असाच त्रास दिला. आम्ही ताकदीने उभे राहिलो असं आता छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. या लेटरबॉम्बचा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांना जो त्रास होतो आहे त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी खासगीत बोलायला हवं होतं. ईडी, आणि इतर यंत्रणांच्या त्रासामुळेच प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब पडला आहे. शरद पवार, एकनाथ खडसे आणि मलाही या ED आणि यंत्रणांनी असाच त्रास दिला. आम्ही ताकदीने उभे राहिलो असं आता छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. या लेटरबॉम्बचा सरकारवर काही परिणाम होईल का? असं विचारलं असता भुजबळ म्हणाले ‘शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी जोपर्यंत एकत्र आहेत तोपर्यंत राज्य सरकारला अजिबात धोका नाही.’ असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

सरनाईकांच्या पत्रावर फडणवीस म्हणतात, कोणाला जोडे मारायचे कोणाला हार घालायचे हे त्यांनीच ठरवायचं !

आणखी काय म्हणाले छगन भुजबळ?

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करा ही मागणी मी बैठकीत चिठ्ठी लिहून केली होती असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे. निवडणुका पुढे ढकला किंवा इम्पेरिकल डेटा द्या अशी मागणी मी केली होती असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं. ओबीसींचे प्रश्न सुटावेत यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पावलं उचलतील ही अपेक्षा मला आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp