भेंडीबाजार उल्लेख आला की सगळं पाण्यात; दरेकरांचा पवारांना टोला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पवारसाहेब तुम्ही माझं पुस्तक वाचा, तुम्हाला नक्कीच माझा आणि भाजपचा अभिमान वाटेल असं उत्तर आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शरद पवारांच्या टीकेला दिलं आहे. भेंडीबाजाराचं वक्तव्य मी जबाबदारीने केलं होतं. मात्र ते झोंबलं, ते आलं की सगळं पाण्यात जातं असंही प्रवीण दरेकरांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले दरेकर?

“आझाद मैदानावर दिल्लीतल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रभरातून शेतकरी आले होते. मी पण तिथे गेलो होतो त्यावेळी तिथे एक मुस्लिम महिला होती तिच्या हातात मी पण शेतकरी असा फ्लेक्स होता. मला तिच्याबद्दल कुतुहल वाटलं म्हणून तिला विचारलं की तुम्ही कुठून आलात? तिने उत्तर दिलं भेंडीबाजार. मी जेव्हा हा प्रश्न त्या महिलेला विचारला त्यावेळी तिथे पोलीसही हजर होते. मी त्यांच्यासमोर या महिलेला प्रश्न विचारला होता. त्यामुळे मी भेंडीबाजाराचं जे वक्तव्य केलं ते अत्यंत जबाबादारीने केलं होतं. पण ते शरद पवार यांना झोंबलं. त्यांनी माझी दखल घेतली आणि जे वक्तव्य केलं त्यावर मी देवेंद्रजींना विचारलं तेव्हा ते म्हणाले प्रवीण तू आता मोठा झालास कारण शरद पवारांनी तुझी दखल घेतली.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आणखी काय म्हणाले दरेकर?

जेव्हा कोरोनाचं संकट होतं तेव्हा कावळे, बगळे पळून गेले होते. वाघही गुहेत दडून बसले होते. त्या काळात देवेंद्र फडणवीस आणि मी महाराष्ट्रामध्ये फिरत होतो असाही टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला.

ADVERTISEMENT

आज प्रवीण दरेकर यांच्या ‘वर्षभराचा लेखाजोखा’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला भाजपच्या आमदारांची, मान्यवरांची उपस्थिती होती.

ADVERTISEMENT

काय म्हणाले होते शरद पवार?

“मला कधी कधी स्वतःबद्दलच वाईट वाटतं, यासाठी वाटतं की कधी काळी मी विधानसभा आणि विरोधी पक्षनेता होतो. याचं कारण म्हणजे प्रवीण दरेकर यांनी केलेलं वक्तव्य. विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचं अवमूल्यन झालं आहे हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. ”

    follow whatsapp

    ADVERTISEMENT