संजय राऊतांसाठी प्रवीण राऊत विमानांची तिकिटं, हॉटेल्स बुक करायचे; पत्नीला 55 लाखही पाठवले-ED
संजय राऊतांसाठी प्रवीण राऊत विमानांची तिकिटं आणि हॉटेल्स बुक करायचे, पत्नीला 55 लाखही पाठवले-ED शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी लेटरबॉम्ब टाकून ईडी या तपासयंत्रणेचा भाजपकडून कसा गैरवापर होतो आहे ते उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना लिहिलं आहे. अशातच ईडी हे पत्रा चाळ येथील 1034 कोटींचा घोटाळा प्रकरण तपासत आहे. ईडीने आता आपल्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं […]
ADVERTISEMENT
संजय राऊतांसाठी प्रवीण राऊत विमानांची तिकिटं आणि हॉटेल्स बुक करायचे, पत्नीला 55 लाखही पाठवले-ED
ADVERTISEMENT
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी लेटरबॉम्ब टाकून ईडी या तपासयंत्रणेचा भाजपकडून कसा गैरवापर होतो आहे ते उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना लिहिलं आहे. अशातच ईडी हे पत्रा चाळ येथील 1034 कोटींचा घोटाळा प्रकरण तपासत आहे. ईडीने आता आपल्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की प्रवीण राऊत हे संजय राऊत यांच्यासाठी विमानांची तिकिटं बुक करत, हॉटेल्स बुक करत आणि प्रवीण राऊत यांच्या पत्नीने संजय राऊत यांच्या पत्नीला 55 लाख रूपये पाठवले होते. त्यामुळे आता या सगळ्यावर संजय राऊत काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
संजय राऊत यांच्यामागे ED हात धुऊन का लागली आहे? पत्रा चाळ प्रकरण काय आहे?
हे वाचलं का?
काय म्हटलं आहे ईडीने?
1034 कोटींच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांना असे आढळून आले आहे की प्रवीण राऊत यांनी गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेतून 55 लाख रुपये शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना त्यांच्या पत्नीच्या खात्यातून दिले आहेत. संजय राऊत आणि संबंधित व्यक्तींच्या देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी हॉटेलमध्ये राहण्याची सोय आणि तिकिटे बुक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांना समजले. तसेच अलिबागमध्ये प्रवीण राऊत यांच्याकडून निधी मिळाल्यानंतर जमीन खरेदी करण्यात आली असून मोठी रक्कम संशयाच्या घेऱ्यात आहे.
ADVERTISEMENT
प्रवीण राऊत यांचा सहकारी आणि संजय राऊतचा जवळचा परिचित असलेल्या सुजित पाटकर यांच्या निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी झडती घेतली असता, संजय राऊत यांच्याशी संबंधित मालमत्तेच्या कागदपत्रांच्या काही झेरॉक्स प्रती सापडल्या. मालमत्तेच्या विक्रेत्यांकडे तपासणी केली असता त्यांना समजले की विक्रेत्यांना मालमत्ता विकण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली होती आणि या जमिनीच्या पार्सलची नोंदणी बाजारभावापेक्षा कमी दराने करण्यात आली होती असंही समोर आल्याचं ईडीने म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
पुढची पत्रकार परिषद सेना भवनमध्ये,मुंबईत शिवसेनाच दादा आहे विसरू नका-संजय राऊत
विक्रेत्यांनी असेही सांगितले की मालमत्तेसाठी चेक पेमेंट व्यतिरिक्त त्यांना रोख पेमेंट केले गेले. ईडीच्या अधिकार्यांना असा संशय आहे की विक्रेत्यांना करोडोंची मोठी रक्कम रोख स्वरूपात दिली गेली आहे आणि नोंदणी मूल्य खूपच कमी आहे. हा निधी कुठून आला ते स्पष्ट झालेलं नाही.
प्रवीण राऊत यांना एचडीआयएलकडून 95 कोटी रुपये मिळाले होते जे 25 टक्के ‘स्वेट इक्विटी’ म्हणून दाखविण्यात आले होते. प्रवीण राऊतच्या अटकेनंतर 7 फेब्रुवारी रोजी एचडीआयएलच्या सीएफओचे स्टेटमेंट नोंदवण्यात आले आणि त्यांनी प्रवीण राऊत यांना एचडीआयएलकडून कोणत्याही प्रकारची ‘स्वेट इक्विटी’ दिल्याचा नकार दिला. प्रवीण राऊत यांना पीएमएलए कोर्टात हजर करताना अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, एचडीआयएल सारंग आणि राकेश वाधवनच्या प्रवर्तकांचे जबाब नोंदवावे लागतील. प्रवीण राऊत यांना पुराव्यांसह सामोरे जावे लागेल आणि त्यामुळे त्याच्या ईडी कोठडीत वाढ करण्याची मागणी अधिकाऱ्यांनी केली होती. त्यानंतर प्रवीण राऊत यांच्या ईडी कोठडीत 14 फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT