शरद पवार राष्ट्रपतीपदाची निवडणूक का लढवत नाहीयेत?, ही आहेत ५ कारणं
देशात सध्या महत्त्वाची निवडणूक लागलीये, तीही सर्वोच्च पदासाठीची. राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक राष्ट्रपतीपदासाठी सर्वमान्य, असा चेहरा शोधत आहेत. त्यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींनी विरोधी पक्षांच्या बोलावलेल्या बैठकीत शरद पवारांच्या नावाला सगळ्यांनी दुजोरा दिला. पण उमेदवार होण्यास पवारांनी नकार दिला. दिल्लीतील कॉन्स्टिट्यशनल क्लबमध्ये विरोधी पक्षांच्या […]
ADVERTISEMENT
देशात सध्या महत्त्वाची निवडणूक लागलीये, तीही सर्वोच्च पदासाठीची. राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक राष्ट्रपतीपदासाठी सर्वमान्य, असा चेहरा शोधत आहेत. त्यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींनी विरोधी पक्षांच्या बोलावलेल्या बैठकीत शरद पवारांच्या नावाला सगळ्यांनी दुजोरा दिला. पण उमेदवार होण्यास पवारांनी नकार दिला.
ADVERTISEMENT
दिल्लीतील कॉन्स्टिट्यशनल क्लबमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. ममता बॅनर्जींनी सांगितलं की, शरद पवार निवडणूक लढवण्यास तयार असतील, तर सर्व विरोधी पक्षाचं यावर एकमत आहे. पण पवारांनी नकार दिल्यानं आता नव्या उमेदवारांचा शोध घेतला जात आहे.
दुसरीकडे एक मुद्दा चर्चेत आला आहे तो म्हणजे शरद पवारांना निवडणूक का लढवायची नाही? शरद पवारांच्या नावाला विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. मग असताना शरद पवार राष्ट्रपती निवडणूक का लढवू इच्छित नाहीत? तर मागे आहेत पाच कारणं…
हे वाचलं का?
मतांचं गणित
शरद पवार राष्ट्रपतीपदाची निवडणूक न लढवण्यामागे पहिलं कारण आहे निवडणूक जिंकण्यासाठी लागणारा मतांचा कोटा. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए स्वबळावर राष्ट्रपती निवडणूक जिंकेल अशी स्थिती नाही. पण त्यांना लागणाऱ्या अधिकच्या मतांचा आकडा मोठा नाही.
ADVERTISEMENT
राष्ट्रपती निवडणुकीत एकूण मते १०,८६,४३१ इतकी आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी ५,४३,२१६ इतकी मतं हवीत. एनडीएजवळ सध्या ५ लाख २६ हजार मते आहेत.
ADVERTISEMENT
दुसरीकडे विरोधी गटातील सर्व राजकीय पक्ष आणि अपक्ष मिळून ५ लाख ६० इतकी मतं आहेत. पण, आजच्या घडीला विरोधकांमध्ये एकजूट नाही. त्यामुळेच विरोधी गटापेक्षा एनडीए मजबूत स्थितीत असल्याचं चित्र आहे. त्यामुळेच शरद पवार जोखीम घेऊ इच्छित नाही. कारण विरोधी पक्षाचा उमेदवार कसा जिंकेल, असा मुद्दा शरद पवारांनीही उपस्थित केला होता.
सुप्रिया सुळेंनी केलं आंदोलन, पण अजित पवार म्हणाले, ‘गौण विषय’
बिजू जनता दल आणि वायएसआर काँग्रेस…
सर्व विरोधकांमध्ये एकी नसल्याचं मोठं कारण म्हणजे ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बैठकीत पाच पक्षाचे नेते उपस्थित नव्हते. यात टीआरएस म्हणजे तेलंगाना राष्ट्र समिती, आम आदमी पार्टी, बीजेडी, वायएसआर काँग्रेस आणि अकाली दल यांचा समावेश आहे.
विशेषतः बीजेडी आणि वायएसआर काँग्रेसने अजूनही राष्ट्र्रपती निवडणुकीबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. हे दोन्ही पक्ष सोबत आल्याशिवाय विरोधक राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकू शकत नाही. विरोधकांची मतं विभागली जाईल आणि विरोधकांचा राष्ट्रपती पदाचा उमेदवारांची स्थिती कुमकुवत होऊन जाईल.
बीजेडी आणि वायएसआर सोबत येईल, याची विरोधी गटातील पक्षांना खात्री नाही. कारण अनेक वेळा हे दोन्ही पक्ष भाजपसोबत गेले आहेत. २०१७ मध्ये झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीतही दोन्ही पक्षांनी एनडीएला साथ दिली होती. अलिकडेच दोन्ही पक्षांचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भेटले होते. हे दोन्ही पक्ष सोबत येण्याची शक्यता कमी असल्यानेच पवारांनी निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शवली.
सक्रिय राजकारणातून निवृत्ती नकोय
शरद पवारांना सक्रिया राजकारणातून दूर जायचं नाही. ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बैठकीनंतरही शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. आपल्याला जनतेची सेवा करत राहायचं, असं म्हटलेलं आहे. राष्ट्रपती झाल्यानंतर पक्षीय राजकारणापासून दूर व्हावं लागतं. त्यामुळेच पवारांनी यापूर्वीही राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यात रस नसल्याचं म्हटलेलं होतं.
काही वर्षांपूर्वी राष्ट्रपती निवडणूक न लढवण्याबद्दलची भूमिका मांडताना शरद पवार म्हणाले होते की, “मला इतक्या लवकर राजकारणातून निवृत्त व्हायचं नाही. जेव्हा तुम्ही राष्ट्रपती बनता तेव्हा तु्म्हाला चांगली हवेली मिळते, पण तुम्हाला लोकांना/माध्यमांना भेटण्याची संधी मिळत नाही.” हेही एक कारण पवारांची निवडणूक न लढवण्याच्या भूमिकेमागे असू शकतं.
विरोधी पक्षांचा एकच उमेदवार असणार; ममता बॅनर्जींनी पवारांचे नाहीतर सुचवली ‘ही’ दोन नावं
मुलीच्या राजकीय भविष्याची चिंता?
राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात शरद पवार बऱ्याच वर्षांपासून सक्रिय आहेत. पण, त्यांचा राजकीय वारसदार कोण असेल, हा प्रश्न नेहमीच चर्चेत राहतो. सुप्रिया सुळे राजकारणात असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक गट असल्याचंही वारंवार समोर आलंय.
२०१९ मध्येच अजित पवारांनी भाजपसोबत जाऊ सरकार स्थापन केलं, त्यावेळीही हे दिसलं. शरद पवार राष्ट्रपती झाले, तर पक्षापासून दूर व्हावं लागले आणि पक्षात फूट पडू शकते, असंही बोललं जातं. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादीत आणि राजकारणात प्रस्थापित करण्याची चिंता शरद पवारांना असावी, त्यामुळेच त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला असावा.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचं गणित; विरोधकांकडे जास्त मतं?, मोदींना धक्का बसणार?
२०२४ ची लोकसभा…
राष्ट्रपती निवडणुकीनंतर देशात २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातही विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांवरही शरद पवारांची नजर आहे. शरद पवार यांना राजकारणातील चाणक्य समजलं जातं. त्यांचं सक्रिय राजकारणातील स्थान शरद पवार कायम ठेवू इच्छित असावेत.
बिकट स्थितीत गेलेली काँग्रेस आणि दूर होत असलेले मित्रपक्ष अशा स्थितीत २०२४ च्या निवडणुकीत शरद पवारांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. कारण शरद पवारांना युपीएचं अध्यक्ष बनवण्याची मागणी सातत्याने होतेय. महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यांचे सर्वच राजकीय पक्षाशी, नेत्यांनी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळेही शरद पवार ही निवडणूक लढवण्यास उत्सुक नसावेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT