Jio Phone Next लॉन्च, फक्त 1,999 रुपयात करता येणार खरेदी; पाहा नेमकी किंमत आणि फीचर्स

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: Reliance ने काही दिवसांपूर्वीच अशी घोषणा केली होती की, त्यांची कंपनी जगातील सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन लॉन्च करेल. त्यानुसार आता Jio Phone Next लाँच करण्यात आला आहे. जाणून घ्या स्मार्टफोनची नेमकी किंमत आणि फीचर्सबाबत सविस्तरपणे.

ADVERTISEMENT

Reliance च्या Jio Phone Next ची विक्री दिवाळीपासून म्हणजेच 4 नोव्हेंबरपासून केली जाणार आहे. कंपनीने ही माहिती दिली आहे. तथापि, Jio कडून ग्राहकांना काही ऑफर देखील दिल्या जाणार आहे, जिओचा हा स्मार्टफोन ग्राहक फक्त 1,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. ग्राहकांना उर्वरित पैसे नंतर ईएमआयद्वारे भरावे लागणार आहे.

या स्मार्टफोनची एकूण किंमत ही 6 हजार 400 रुपये एवढी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे हा जगातील सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन आहे की नाही हे आता आपणच ठरवावं.

हे वाचलं का?

Jio Phone Next स्मार्टफोनचे खास फीचर्स:

  • Jio Phone Next हा Qualcomm प्रोसेसर आणि Android आधारित Pragati OS वर चालणारा अल्ट्रा-अफोर्डेबल स्मार्टफोन आहे. Jio कडून माहिती देण्यात आली आहे की प्रगती OS ही Android चं ऑप्टिमाइझ व्हर्जन आहे. जी खास JioPhone Next साठी तयार करण्यात आली आहे. यामध्ये 10 भारतीय भाषांसाठी सपोर्ट मिळणार आहे.

ADVERTISEMENT

  • Jio Phone Next मध्ये 5.45-इंचीचा मल्टीटच डिस्प्ले देण्यात आलेला आहे. तसेच स्क्रीन रेझ्युलेशन एचडी प्लस आहे. याला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन देण्यात आलं आहे आणि त्यासोबत अँटी फिंगरप्रिंट कोटिंगही आहे.

  • ADVERTISEMENT

  • गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही Jio Phone Next लॉन्चवर ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये Google ब्लॉगची लिंक आहे जिथे Jio Phone Next चे तपशील आहेत. वास्तविक, रिलायन्स जिओने Jio Phone Next साठी गुगलसोबत करार केला आहे.

  • Jio Phone Next मध्ये Qualcomm 215 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा क्वॉड कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. ज्याचा वेग 1.3GHz पर्यंत आहे. या स्मार्टफोनमध्ये 2GB रॅम मिळणार आहे.

    • Jio Phone Next मध्ये 32GB चं इंटर्नल स्टोरेज देण्यात आलं आहे. मायक्रो एसडी कार्ड सपोर्टही देण्यात आला आहे. याच्या मदतीने आपण मेमरी 512GB पर्यंत वाढवू शकता.

    • Jio Phone Next मध्ये दोन सिम सपोर्ट असणार आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये मायक्रो यूएसबी पोर्ट आणि हेडफोन जॅक आहे. ब्लूटूथ आणि वायफायची कनेक्टिव्हिटी देखील उपलब्ध आहे.

    • या स्मार्टफोनमध्ये एक्सलेरोमीटर, लाईट सेन्सर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर देण्यात आले आहेत. फोनचा फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे, तर रिअर कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे. Jio Phone Next ची बॅटरी 3,500mAh क्षमतेची आहे.

    • Jio Phone Next मध्ये Google कॅमेरा F देण्यात आला आहे, जो HDR ला देखील सपोर्ट करतो. याशिवाय नाईट मोड आणि सॉफ्टवेअर बेस्ड पोर्ट्रेट मोडलाही सपोर्ट करतं.

    Jio चा हा स्मार्टफोन मिळणार स्वस्तात, पाहा फिचर्स

    Jio Phone Next स्मार्टफोनच्या किंमतीविषयी सर्व माहिती

    Jio Phone Next हा Android आधारित Pragati ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. या फोनची मूळ किंमत ही 6,499 रुपये आहे. पण 1,999 रुपयात हा फोन खरेदी करता येणार आहे. दरम्यान, ग्राहकांना दिवाळीपासून हा खरेदी करता येणार असून कंपनीने ईएमआयचा पर्यायही ठेवला आहे.

    जर तुम्ही ते 1,999 रुपये देऊन हा स्मार्टफोन खरेदी केला तर नंतर तुम्हाला दर महिन्याला त्याचा EMI द्यावा लागणार आहे. तुम्ही 18 महिने किंवा 24 महिन्यांचा देखील EMI सेट करू शकता.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT