PM Modi : “मी पंतप्रधान म्हणून नाही, तर तुमच्या कुटुंबातील व्यक्ती म्हणून इथे आलोय”
देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेतल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीचा सण लष्करातील जवानांसोबत साजरी करतात. यंदाही पंतप्रधान मोदी दिवाळी साजरी करण्यासाठी सकाळीच काश्मीर खोऱ्यात दाखल झाले. (Prime Minister Narendra Modi met top Army officials and other jawans in the Nowshera sector) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मिरातील राजौरी जिल्ह्यातील नौशेरात जवानांना मिठाई भरवून दिवाळी साजरी केली. […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेतल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीचा सण लष्करातील जवानांसोबत साजरी करतात. यंदाही पंतप्रधान मोदी दिवाळी साजरी करण्यासाठी सकाळीच काश्मीर खोऱ्यात दाखल झाले. (Prime Minister Narendra Modi met top Army officials and other jawans in the Nowshera sector)
हे वाचलं का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मिरातील राजौरी जिल्ह्यातील नौशेरात जवानांना मिठाई भरवून दिवाळी साजरी केली. गुरूवारी सकाळीच पंतप्रधान नौशेरात पोहोचले. यावेळी पंतप्रधानांनी जवानांशी संवादही साधला.
ADVERTISEMENT
जवानांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “प्रत्येक वर्षी मी ज्यांच्यासोबत दिवाळी साजरी करतो, तेच माझं कुटुंब आहे. गुजरातचा मुख्यमंत्री असताना आणि पंतप्रधान झाल्यानंतरही मी अशाच पद्धतीने दिवाळी साजरी केली.”
ADVERTISEMENT
“सीमेवर जवान दक्ष असतात त्यामुळे संपूर्ण देश सुखाने झोप घेऊ शकतो. सीमेवरील जवान हे देशाचं सुरक्षा कवच आहे. त्यांच्यामुळेच देशातील सुरक्षा आणि शांतता कायम आहे. देशाचे जवान शौर्याचं जिवंत उदाहरण आहे.”
यावेळी पंतप्रधानांनी जवानांचं धैर्यही वाढवलं. नौशेरातील जवानांच्या धाडसाचं कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले, “ज्या ज्या वेळी शूत्रने इथल्या भूमीवर पाय ठेवला. त्यावेळी त्याला चोख प्रत्युत्तर मिळालं आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आपण एकटे आलेलो नसून, 130 कोटी भारतीयांचा आशीर्वाद घेऊन आलो आहोत, असं मोदी यावेळी जवानांना संबोधित करताना म्हणाले.
लष्कराच्या शस्त्र खरेदीवरून मोदींनी आधीच्या सरकारांवरही निशाणा साधला. “यापूर्वी देशाच्या जवानांसाठी शस्त्र खरेदी करायची असायची त्यावेळी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागायचं. पण आता आत्मनिर्भर भारत करण्यावर जोर दिला जात आहे. आता देशातच अत्याधुनिक शस्त्र तयार केले जात आहेत”, असं मोदी यावेळी म्हणाले.
लष्कारातील महिलांच्या वाढत्या संख्येबद्दल मोदींनी आनंद व्यक्त केला. “आता एनडीए आणि इतर लष्करी शाळांमधून मुलींनाही पूर्ण संधी दिली जात आहेत. लष्करात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे भारताच्या लष्कराची प्रतिमा जगभरात मजबूत झाली आहे”, असं मोदी म्हणाले.
“सर्जिकल स्ट्राईकमध्ये इथल्या ब्रिगेडिअरची जी भूमिका निभावली, ती देशवासियांसाठी अभिमानास्पद होती. तो दिवस माझ्या कायम स्मरणात राहिल. सूर्यास्ताच्या अगोदर सगळे जण परत यायला हवेत, असं ठरवलं होतं. प्रत्येक क्षणाला माझं लक्ष फोनच्या रिंगकडे होतं. वीर जवान पराक्रम करून परतले”, असं मोदी म्हणाले.
“सर्जिकल स्ट्राईकनंतरही शेकडो वेळा अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न केले गेले. आजही होतात. पण प्रत्येक वेळी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जातं. पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात इथे वास्तव केलं होतं, असं मानलं जातं”, असंही मोदी म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT