India Today Conclave 2023 : PM मोदी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हला करणार संबोधित

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

India Today Conclave 2023 :

ADVERTISEMENT

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) येत्या 17 आणि 18 मार्च रोजी दिल्लीत आयोजित इंडिया टुडे कॉन्क्लेव्हला संबोधित करणार आहेत. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हचे (India Today Conclave 2023) हे २० वे वर्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वीही इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये उपस्थिती दर्शविली आहे. याआधी २०१९ मध्ये म्हणजेच कोरोना महामारीपूर्वी पंतप्रधान मोदींनी या कॉन्क्लेव्हला संबोधित केलं होतं. (Prime Minister Narendra Modi will address the India Today Conclave 2023.)

पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक मानले जातात. एकीकडे आर्थिक आणि राजकीय उलाथपालथ आणि दुसरीकडे भारतात पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार असल्याने पंतप्रधान मोदींच्या या संबोधनाला महत्व प्राप्त झालं आहे. कोरोना काळानंतर संपूर्ण जग आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्याचवेळी भारत मात्र या संकटातून मजबुतीने बाहेर पडला आणि जगासाठी एक आशेचा किरण होऊन समोर आला. २०२३ मध्ये भारताने जगभरात महत्वाचं स्थान घेतलं आहे. भारत या वर्षी स्वच्छ ऊर्जा आणि आर्थिक सुधारणांवर लक्ष केंद्रीत करणाऱ्या G20 शिखर परिषदेचेही यजमानपद भूषवत आहे.

हे वाचलं का?

इंडिया टुडे ग्रुपचे उपाध्यक्ष कली पुरी यांच्या मते, कॉन्क्लेव्हमधील पंतप्रधान मोदींचे संबोधन त्यांच्या नेतृत्वाची दिशा आणि रणनीती स्पष्ट करणारे असणार आहे.

India Today Conclave 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बंडानंतरची रोखठोक मुलाखत

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हला 6 वेळा संबोधित केलं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी या कार्यक्रमातून भारताला गुजरात मॉडेलची ओळख करून दिली होती. 2003, 2008, 2011 मध्ये इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये त्यांनी हजेरी लावली आहे. त्यानंतर पंतप्रधान म्हणून त्यांनी नव्या भारताचे लक्ष्य सर्वांसमोरं ठेवलं होतं. पंतप्रधान मोदींनी 2017 आणि 2019 मध्येही इंडिया टुडे कॉन्क्लेव्हला संबोधित केलं आहे.

ADVERTISEMENT

India Today Conclave Mumbai : ते कबूल कसं करतील?, उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा प्रहार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय त्यांचे सर्वात विश्वासू सहकारी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, किरेन रिजिजू, लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, खासदार महुआ मोईत्रा, शशी थरूर, पी चिदंबरम, भारतरत्न सचिन तेंडुलकर, उद्योगपती अनिल अग्रवाल, संजीव गोयंका, माजी सरन्यायाधीश शरद बोबडे, उदय लळीत, सुपरस्टार राम चरण आदी नामवंत इंडिया टुडे कॉन्क्लेव्हच्या मंचावर 17 आणि 18 मार्च रोजी उपस्थित राहणार आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT