चिकन, पुरणपोळी ते कचोरी; राज्यातील कारागृहांमधील कैद्यांना ३० हून अधिक वस्तू मिळणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

चिकन, पुरणपोळी, फरसाण, जिलेबी, फळं, पनीर आणि असे अनेक पदार्थ आता राज्यातील कारागृहांमध्ये मिळणार आहेत. कारागृहातील कैद्यांच्या आरोग्यासह रोजच्या आहाराची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्यातेच अतिरीक्त महासंचालक (तुरुंग) सुनील रामानंद यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ज्यात कैद्यांना जेलमध्ये दैनंदिन वापरासाठी ३० हून अधिक वस्तू विकत घेता येणार आहेत.

ADVERTISEMENT

चिकनपासून एनर्जी बारपर्यंत सर्व वस्तू आता कैद्यांना कारागृहात मिळणार आहेत त्यामुळे हे कारागृह आहे की एखादं रेस्टॉरंट असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात तयार व्हायला लागला आहे.

कारागृहातील कैद्यांना मिळणारे पदार्थ खालील प्रमाणे :

हे वाचलं का?

फरसाण , मिठाई , बेकरीचे पदार्थ , ड्राय फ्रुट्स , सिझनल फ्रुट्स , दही , पनीर , लस्सी , सरबत, हवाबंद मांसाहारी पदार्थ , कचोरी, चिकन , मासे , शिरा , लाडू , चिवडा , शंकरपाळी , चकली , करंजी , श्रीखंड , आम्रखंड , शेव , पापडी , लोणचे , सामोसा , च्यवनप्राश

म्हैसूरपाक, जिलेबी, पेढे , चहा , कोफी , फेस वॉश , टर्मरिक क्रीम , एनर्जी बार , ग्लुकोन डी , अंघोळीचे साबण , अगरबत्ती , बूट पॉलिश  ग्रीटिंग कार्ड , मिक्स व्हेज, अंडा करी , वडा पाव, कॉर्नफ्लेक्स , बोर्नव्हिटा , चॉकलेट  , उकडलेली अंडी , पनीर मसाला , पुरणपोळी , आवळा , कँडी , मुरांबा , गुलाबजाम , आंबा , पेरू , बदाम शेक , ताक , दूध , गूळ , गाईचे शुद्ध तूप, बटर, खिचडी , डिंक लाडू , बेसन लाडू , आले पाक , बटाटा भजी हे पदार्थ कैद्यांना विकत घेणार आहे.

ADVERTISEMENT

कैद्यांनी आतमध्ये काम करुन कमावलेल्या पैशांमधून साडेचार हजाराची खरेदी त्यांना करता येणार आहे. कारागृहातील कुशल आणि अकुशल कैदी अशी वर्गवारी केली जाते. त्यांना त्यांच्या कामासाठी ४९ ते ७९ रुपये दिले जातात. तसेच कैद्यांनी केलेल्या कामाच्या पैशातून आणि कुटुंबीयांकडून संबधित कैद्याच्या खात्यावर पाठविण्यात आलेल्या रकमेतून वस्तु खरेदी करता येणार आहे. पण ही खरेदी केवळ 4 हजार 500 रूपयांपर्यंत करता येणार आहे. कदाचित याच सुखसोईंमुळे कारागृहातील ५३ कैद्यांनी पॅरोल घेण्यास नकार दिला आहे. कारागृहात मिळणारी वैद्यकीय सुविधा व इतर गोष्टींमुळे या कैद्यांनी पॅरोल घेण्यास नकार दिल्याचं कळतंय.

ADVERTISEMENT

कारागृहातील 4 हजार 60 कैद्यांना आतापर्यंत करोनाची लागण –

राज्यातील ४ हजार ६० कैद्यांना आतापर्यंत करोना आजाराची लागण. त्यापैकी ३ हजार ९३३ जण करोना मुक्त झाले. तर सध्या ११४ सध्या उपचार घेत असून १३ जणांचा मृत्यू झाला. तसेच कारागृहातील ९१८ कर्मचारी करोना बाधित आढळले आहे. त्यातील ८५९ जण कर्मचारी आणि अधिकारी बरे झाले तर १० कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला तर ५० जण सध्या उपचार घेत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT