कोण होते मनसुख हिरेन?? त्या दिवशी काय घडलं, जाणून घ्या घटनाक्रम
प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर २५ फेब्रुवारीला एक संशयित स्कॉर्पिओ आढळली होती. या स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीनच्या कांड्या आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. परंतू शुक्रवारी या संशयित स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत सापडल्यामुळे या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलं आहे. सकाळी १० वाजून २५ मिनीटांनी हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येखील […]
ADVERTISEMENT

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर २५ फेब्रुवारीला एक संशयित स्कॉर्पिओ आढळली होती. या स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीनच्या कांड्या आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. परंतू शुक्रवारी या संशयित स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत सापडल्यामुळे या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलं आहे. सकाळी १० वाजून २५ मिनीटांनी हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येखील खाडीतून बाहेर काढण्यात आला. रात्री उशीरा हिरेन यांच्या मृतदेहावर पोस्ट मार्टम पूर्ण करण्यात आलं.
मनसुख हिरेन प्रकरणात पोस्ट मार्टम पूर्ण, ठाणे पोलीस म्हणतात…
दरम्यान या घटनेनंतर मनसुख हिरेन हे नेमके होते तरी कोण आणि मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांच्याशी त्यांचे नेमके काय संबंध होते यावरुन चर्चांना उधाण आलेलं आहे. मनसुख हिरेन हे मुळचे ठाण्याचे रहिवासी होते. डॉ. आंबेडकर रोडवरील विकास पाम या सोसायटीत १४ व्या माळ्यावर हिरेन यांचं घर आहे. गेल्या १२ ते १५ वर्षांपासून हिरेन ठाण्यात राहत होते, त्यांच्यामागे ३ मुलं आणि पत्नी असा परिवार आहे. हिरेन यांचं ठाण्याच्या नौपाडा भागात कारच्या पार्ट्सचं दुकानं होतं. हिरेन यांचं स्वतःचं कारच्या पार्ट्सचं दुकान असलं तरीही ते स्कुटरवरुन प्रवास करायचे.
मुंब्रा खाडीत हिरेन यांचा मृतदेह आढळल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत होता. परंतू त्यांच्या पत्नीने हिरेन हे चांगले स्विमर होते. सोसायटीतल्या स्विमींग पूलमध्ये हिरेन आपल्या मुलांसह अन्य मुलांनाही पोहायला शिकवायचे. त्यामुळे हिरेन हे आत्महत्या करु शकणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांच्या पत्नीने दिली.