अनुपम खेर यांनी सुरु केलं ‘प्रोजेक्ट हील इंडिया’; वैद्यकीय उपकरणांची करणार मदत
देशात कोरोनाने कहर माजवलाय. रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. अशातच बेड्स तसंच ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्याचं चित्र आहे. या गोष्टींची कमतरता भासू नये यासाठी अनेक सेलिब्रिटींनी पुढाकार घेतलाय. यामध्येच आता बॉलिवूडचे अभिनेते अनुपम खेर यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. अनुपम खेर फाऊंडेशनच्या मार्फत ग्लोबल कैंसर फाउंडेशनचे डॉ आशुतोष तिवारी तसंच भारत फोर्जेचे बाबा कल्याणी यांच्यासोबत […]
ADVERTISEMENT
देशात कोरोनाने कहर माजवलाय. रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. अशातच बेड्स तसंच ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्याचं चित्र आहे. या गोष्टींची कमतरता भासू नये यासाठी अनेक सेलिब्रिटींनी पुढाकार घेतलाय. यामध्येच आता बॉलिवूडचे अभिनेते अनुपम खेर यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.
ADVERTISEMENT
अनुपम खेर फाऊंडेशनच्या मार्फत ग्लोबल कैंसर फाउंडेशनचे डॉ आशुतोष तिवारी तसंच भारत फोर्जेचे बाबा कल्याणी यांच्यासोबत ‘प्रोजेक्ट हील इंडिया’ या योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून कोरोनाच्या लढाईविरोधात मदत केली जाणार असून देशातील संस्था त्याचप्रमाणे रूग्णालयांना गरजेची उपकरणं आणि साधनं पोहोचवण्यात येणार आहेत.
यासंदर्भात अनुपम खेर यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ देखील शेअर केला आहे. या व्हीडिओमध्ये ते म्हणतात, “कोरोनाशी लढा देण्यासाठी आम्ही रुग्णांसाठी आवश्यक वस्तू देशाच्या वेगवेगळ्या भागातील रुग्णालयात पाठवत आहोत. आमच्या फाऊंडेशनने ही सुविधा महाराष्ट्र, बिहार, जम्मू आणि काश्मीरसह अनेक राज्यांच्या शहरांमध्ये दिली आहे. अमेरिकेतून डॉ. आशुतोष तिवारी यांच्याकडून ही उपकरणं आली आहेत. ही सर्व सामग्री गरजू लोकांपर्यंत पोहोचावी अशीच आमची इच्छा आहे.”
हे वाचलं का?
अनुपम खेर यांच्या व्यतिरिक्त आणखीही अनेक सेलिब्रिटी कोरोनाच्या कठीण काळात लोकांना मदत करत आहेत. या यादीमध्ये सोनू सूद, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, सलमान खान, अमिताभ बच्चन, अजय देवगन, विकास खन्ना यांची नावं आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT