पुणे : मुलीच्या हत्येनं सर्वांची मान शरमेनं खाली गेलीये; अजित पवारांना संताप अनावर
मागील महिन्यात बलात्कारांच्या घटनांमुळे चर्चेत आलेल्या पुण्यात मंगळवारी हादरवून टाकणारी घटना घडली. पुण्यातील बिबवेवाडीत एका अल्पवयीन मुलीची कोयत्याने वार करत क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनाही संताप अनावर झाला. (minor girl murdered in pune by relative) अजित पवार यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला […]
ADVERTISEMENT
मागील महिन्यात बलात्कारांच्या घटनांमुळे चर्चेत आलेल्या पुण्यात मंगळवारी हादरवून टाकणारी घटना घडली. पुण्यातील बिबवेवाडीत एका अल्पवयीन मुलीची कोयत्याने वार करत क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनाही संताप अनावर झाला. (minor girl murdered in pune by relative)
ADVERTISEMENT
अजित पवार यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला असून, अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण आहे, असं सांगत चिंताही व्यक्त केली आहे. आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा दिली जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
पुण्यातील घटनेवर अजित पवार म्हणाले, ‘पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनी कबड्डी खेळताना तिच्यावर कोयत्यानं वार करुन हत्या झाल्याची घटना अत्यंत निंदनीय; माणूसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण आहे’, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
हे वाचलं का?
पुणे हादरलं! आठवीत शिकणाऱ्या मुलीवर कोयत्याने वार, एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याचा अंदाज
‘शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येनं सर्वांची मान शरमेनं खाली गेली आहे. मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आरोपींचा शोध घेऊन त्यांना तत्काळ अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. आरोपींना लवकरात लवकर कठोरात कठोर शासन करण्यात येईल’, अशी ग्वाही अजित पवार यांनी या घटनेबद्दल बोलताना दिली आहे.
ADVERTISEMENT
शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येनं सर्वांची मान शरमेनं खाली गेली आहे. मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आरोपींचा शोध घेऊन त्यांना तत्काळ अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. आरोपींना लवकरात लवकर कठोरात कठोर शासन करण्यात येईल.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 13, 2021
भयंकर! धावत्या ट्रेनमध्ये तरुणीवर बलात्कार; इगतपुरी-कसारादरम्यान घडली घटना
ADVERTISEMENT
काय घडलं?
क्षितिजा अनंत व्यवहारे ही आठवीत शिक्षण घेणारी मुलगी सायंकाळच्या सुमारास कबड्डीच्या सरावा करीता आली होती. क्षितिजाच्या नात्यातील हृषिकेश ऊर्फ शुभम भागवत हा त्याच्या मित्रांसोबत दुचाकीवरून तिथे आला.
क्षितिजा कबड्डी खेळत असतानाच काही समजण्याच्या आत त्याने क्षितिजावर कोयत्याने आणि चाकूने सपासप वार केले. यावेळी क्षितिजासोबत असलेल्या मैत्रिणींना धमकी देत पळवून लावलं आणि आरोपी देखील घटनास्थळावरून पसार झाला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT