खिशाला लावलेल्या बॉलपेनमुळे बिंग फुटलं, घरफोडी करणारे आरोपी पुणे पोलिसांच्या जाळ्यात
पोलिसांच्या जाळ्यात अडकू नये यासाठी आरोपी नेहमी कसोशीने प्रयत्न करत असतात हे आपण अनेकदा ऐकलं आहे आणि बातम्यांमध्ये अनुभवलंही आहे. परंतू कायद्याचे हात हे कधी ना कधी आरोपीपर्यंत पोहचतातच. अनेकदा आरोपींच्या एका छोट्या चुकीमुळे पोलिसांचं काम सोपं होऊन जातं आणि आरोपी गजाआड होता. पुणे पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या एका टोळीला खिशात लावलेल्या बॉलपेनवरुन अटक केली आहे. […]
ADVERTISEMENT
पोलिसांच्या जाळ्यात अडकू नये यासाठी आरोपी नेहमी कसोशीने प्रयत्न करत असतात हे आपण अनेकदा ऐकलं आहे आणि बातम्यांमध्ये अनुभवलंही आहे. परंतू कायद्याचे हात हे कधी ना कधी आरोपीपर्यंत पोहचतातच. अनेकदा आरोपींच्या एका छोट्या चुकीमुळे पोलिसांचं काम सोपं होऊन जातं आणि आरोपी गजाआड होता. पुणे पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या एका टोळीला खिशात लावलेल्या बॉलपेनवरुन अटक केली आहे.
ADVERTISEMENT
पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी गजराज मोतीलाल वर्मा (मध्यप्रदेश), गोरे ऊर्फ गणेश रती राणा (नवी मुंबई, मुळचा नेपाळ) व शशिकांत भीमराव जाधव (सोलापुर), या संशयित आरोपींनी अटक केली आहे.
अमेरिकेतला जन्म, घरात श्रीमंती…तरीही मुलगा पुण्यात येऊन बनला सराईत चोर
हे वाचलं का?
तीन आरोपींपैकी गजरात वर्मा हा विमानतळ परिसरात कारमधून येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुन तपासणीदरम्यान एका संशयित कारची पोलिसांनी झडती घ्यायला सुरुवात केली. लोहगावजवळ या कारची चौकशी होत असताना पोलिसांना चालकाने आपल्या खिशात लावलेल्या बॉलपेनवर नजर गेली. त्या बॉलपेनवर अरविंद हिंगे असं नाव लिहीलं होतं. परंतू कारचालकाचं नाव आणि त्याच्या पेनावरील नावात साधर्म्य नसल्यामुळे पोलिसांनी या कारचालकाला ताब्यात घेतलं.
अधिक चौकशीदरम्यान पोलिसांनी विमानतळ भागात राहणाऱ्या हिंगे नावाच्या व्यक्तीने १५ ऑक्टोबरला घरफोडीती तक्रार दिल्याचं कळलं. यानंतर कारची झडती घेतली असता त्यात घरफोडीसाठी लागणारं सर्व साहित्य पोलिसांना मिळालं. यानंतर चालकाला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यानेच आपण वर्मा असल्याचं कबूल करत आपल्या दोन साथीदारांची माहिती दिली.
ADVERTISEMENT
वर्माने दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी राणा आणि जाधव यांना अटक केली. या तिन्ही आरोपींनी विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत आठ, तर चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक, असे एकूण नऊ घरफोडीचे गुन्हे केल्याचे कबूल केले. वर्मा व राणा यांच्याविरुद्ध यापूर्वी घरफोडीचे २४ गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपींकडून २९ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT