Ganesh Marne Murder Conspiracy : कुख्यात गुंड शरद मोहोळसह सर्वांची निर्दोष मुक्तता

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ आणि त्याच्या साथीदारांची पुणे सत्र न्यायालयाने गणेश मारणेच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षाकडून १० साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली होती.

ADVERTISEMENT

जाणून घ्या काय आहे हे प्रकरण?

पुण्यात मारणे आणि मोहोळ या दोन टोळ्यांमधलं युद्ध हे आता जगजाहीर झालं आहे. २००६ साली पुण्यात संदीप मोहोळची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी गणेश मारणेला अटक केली होती. या अटकेनंतर गणेश मारणेच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांनी शरद मोहोळ, अनिल खोले, विजय कडू, विकास पायगुडे आणि आलोक भालेराव यांना अटक केली होती. २०१२ साली झालेल्या या अटकेत पोलिसांनी सर्व आरोपींवर ससून हॉस्पिटल ते शिवाजी नगर कोर्टाची रेकी केल्याचं सांगितलं होतं. या सर्व आरोपींकडून पोलिसांना १० पिस्तुल आणि ७९ जिवंत काडतुसं मिळाली होती.

हे वाचलं का?

यानंतर २५ डिसेंबरला न्यायालयात झालेल्या युक्तीवादात आरोपींकडून तानाजी सोलनकर आणि मयूर दोडके या वकीलांनी बाजू मांडली. सरकारी पक्षाला आरोपींवर असलेला एकही गुन्हा सिद्ध करता आला नाही. त्यातच पोलिसांनी या प्रकरणात ज्याच्या हत्येचा कट रचला होता त्या गणेश मारणेचा जबाबही नोंदवला नाही. त्यामुळे हाच युक्तीवाद करत आरोपीच्या वकीलांनी सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा दावा केला. सत्र न्यायालयानेही ही बाजू मान्य करत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT