Punjab Election Counting: ‘आप’चा विद्यामान मुख्यमंत्रांना डबल शॉक; चन्नी आजच राजीनामा देणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. एक्झिट पोलने वर्तवलेल्या अंदाजानुसार आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये बहुमताच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली आहे. राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेसची यंदा पंजाबमध्ये दयनीय अवस्था झालेली दिसत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांना आम आदमी पक्षाने डबल शॉक दिला आहे.

ADVERTISEMENT

चन्नी यंदाच्या निवडणुकीत चमकुर साहीब आणि भादूर या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. परंतू या दोन्ही मतदारसंघात चन्नी हे सध्या पिछाडीवर पडले असून आम आदमी पक्षाचे उमेदवार या मतदारसंघात आघाडीवर आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चरणजीतसिंग चन्नी आजच आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असून ते लवकरच पंजाबचे राज्यपाल बन्वारीलाल पुरोहीत यांची भेट घेणार आहेत. गुरुवारी सकाळी चन्नी आपल्या चंदीगड येथील शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील कॅप्टन अमरिंदर आणि सिद्धू यांच्यातील वादाचा फटका पक्षाला बसल्याचं दिसत आहे.

हे वाचलं का?

निकालाआधीच AAP कडून सेलिब्रेशनची तयारी

निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने पंजाबमध्ये बदल केला होता. कॅप्टन अमरिंदर यांना पदावरुन पायउतार व्हावं लागल्यानंतर चरणजीतसिंह चन्नी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली होती. निवडणुका जाहीर झाल्यानंतर पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करताना राहुल गांधी यांना बराच वेळ घ्यावा लागला. परंतू चन्नी यांच्या दलित चेहऱ्याचं महत्व लक्षात घेऊन काँग्रेसने चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाचं उमेदवार जाहीर केलं होतं. परंतू अवघ्या काही महिन्यांमध्ये राज्यातील राजकारणाचं चित्र पलटल्यामुळे विद्यमान मुख्यमंत्र्यांना दोन्ही मतदारसंघातून पराभव स्विकारण्याची वेळ आलेली आहे.

ADVERTISEMENT

आम्ही देशभरात काँग्रेसची जागा घेणार, पंजाबमधील यशानंतर ‘आप’चा आत्मविश्वास दुणावला

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT