दोन राजकीय बाहुबलींना लोळवलं; जाणून घ्या सिद्धु-मजिठीयांना हरवणाऱ्या ‘आप’च्या पॅडवूमन बद्दल
पंजाब विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस आणि सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या अकाली दलाला धोबीपछाड देत आम आदमी पक्षाने सत्तेच्या दिशेने कूच केलं आहे. भगवंत मान यांच्या रुपाने आम आदमी पक्षाला दिल्लीच्या बाहेर पहिलाच मुख्यमंत्री मिळाला आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज मतदारांना पराभव स्विकारावा लागला. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धु, अकाली दलाचे विक्रमजीतसिंह मजिठीया या बाहुलबलींना पराभूत अमृतसर […]
ADVERTISEMENT

पंजाब विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस आणि सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या अकाली दलाला धोबीपछाड देत आम आदमी पक्षाने सत्तेच्या दिशेने कूच केलं आहे. भगवंत मान यांच्या रुपाने आम आदमी पक्षाला दिल्लीच्या बाहेर पहिलाच मुख्यमंत्री मिळाला आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज मतदारांना पराभव स्विकारावा लागला. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धु, अकाली दलाचे विक्रमजीतसिंह मजिठीया या बाहुलबलींना पराभूत अमृतसर पूर्व मतदारसंघात आम आदमी पक्षाच्या जीवनज्योत कौर विजयी ठरल्या आहेत.
निवडणुक आयोगाच्या आकडेवारीनुसार, जीवनज्योत कौर यांना 39 हजार 679, मजिठीया यांना 25 हजार 188 तर सिद्धु यांना 32 हजार 929 मतं मिळाली आहेत.
एकीकडे प्रचारादरम्यान सिद्धु आणि मजिठीया यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असताना जीवनज्योत कौर यांनी आपल्या श्री हेमकुंत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून लोकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. जीवनज्योत कौर या EcoShe Menstrual Health Programme शी संलग्न झाल्या आहेत. कारागृहातील महिला कैदी, शाळा, झोपडपट्टीतील वस्ती आणि ग्रामीण भागात इको फ्रेंडली सॅनिटरी नॅपकिन वाटत या महिलांना याचे फायदे समजावून सांगण्यात त्या आघाडीवर असतात. त्यांच्या या कामामुळे जीवनज्योत यांना अमृतसरमध्ये पॅड वूमन ही उपाधी मिळाली आहे.
मोबाईल रिपेअरिंगचं दुकान, बसमधून प्रवास करत प्रचार, कोण आहेत चन्नींना हरवणारे लभ सिंग?









