मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत दिग्गजांना मागे सारलं, कोण आहेत चरणजीत सिंह चन्नी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढील मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याबाबतचा सस्पेंस आता संपला आहे. दोन दिवसांच्या विचारमंथन आणि चक्रावून टाकणाऱ्या राजकीय डावपेचानंतर चरणजीत सिंह चन्नी यांचे नाव निश्चित झाले. आता चरणजित पंजाबचे पुढील मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार बऱ्याच चर्चांनंतर काँग्रेसकडून चरणजित यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून घोषणा करण्यात आली. पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. त्यामुळे अचानक मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले चरणजीत सिंग हे नेमके आहेत तरी कोण याबाबत आता सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

गांधी कुटुंबीयांच्या जवळचे अशी चन्नी यांची ओळख

हे वाचलं का?

नवज्योतसिंग सिद्धू आणि सुखजिंदरसिंग रंधवा यांच्याशिवाय पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून सुनील जाखड, प्रताप सिंह बाजवा यांची नावेही चर्चेत होती. त्यानंतर रविवारी सकाळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री अंबिका सोनी यांचेही नाव समोर आले होते. पण त्यांनी त्यासाठी नकार दिला. यानंतर पक्षाने चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. चन्नी हे गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय मानले जातात.

चमकौर साहिब मतदारसंघाचे आमदार

ADVERTISEMENT

चरणजीत सिंह चन्नी हे पंजाब राज्यातील चमकौर साहिब मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवाराचा सुमारे 12000 मतांच्या फरकाने पराभव केला होता. यापूर्वी 2012 च्या निवडणुकीत त्यांनी सुमारे 3600 मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. चरणजीत सिंह चन्नी हे युवक काँग्रेसशी देखील जोडलेले आहेत आणि या काळात त्यांची राहुल गांधींशी जवळीक अधिक वाढली होती.

ADVERTISEMENT

पंजाब काँग्रेसचा दलित शीख चेहरा

चरणजीत सिंह चन्नी हे पंजाब काँग्रेसमधील एक महत्त्वाचे नेते मानले जातात. तो पंजाबमधील एक महत्त्वाचा दलित शीख चेहरा मानला जातो. पंजाबमध्ये सर्वात जास्त दलित शीख आहेत. त्यांची संख्या सुमारे 32% हून अधिक आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेसने मुख्यमंत्रीपदी दलित शीख चेहरा देत दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला असावा.

कालपासून जी चर्चा सुरु होती त्यात असं म्हटलं जात होतं. की, पंजाबमध्ये उपमुख्यमंत्री दलित समाजातील असू शकतो. परंतु काँग्रेस हायकमांडने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत थेट दलित नेत्याची मुख्यमंत्रीपदी निवड केली. चरणजीत सिंह चन्नी हे पंजाबमधील दलित शीख नेत्यांपैकी सर्वाधिक जनाधार असलेले नेते आहेत.

वादात सापडले होते चन्नी

चरणजीत सिंग चन्नी यांचं नाव #MeToo मध्ये समोर आलं होतं. याच वर्षी मे महिन्यात त्यांचं नाव 3 वर्षे जुन्या प्रकरणात समोर आलं होतं. त्यांच्यावर असा आरोप करण्यात आला होता की, त्यांनी एका महिला आयएएस अधिकाऱ्याला 2018 साली एक आक्षेपार्ह मेसेज पाठवला होता. या प्रकरणाबाबत महिला अधिकाऱ्याने तक्रार केली नव्हती. पण पंजाब महिला आयोगाने या प्रकरणाबाबत मे महिन्यात राज्य सरकारला नोटीस पाठवली होती, तेव्हा हे प्रकरण पुन्हा समोर आले होते. दरम्यान, त्या महिला अधिकाऱ्याने पंजाबच्या बाहेर आपली बदली करवून घेतली होती.

टॉस करुन केली होती लेक्चररची पोस्टिंग

पंजाब सरकारमध्ये तंत्रशिक्षण मंत्री असताना चरणजीत सिंह चन्नी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यामध्ये ते आपल्या कार्यालयात नाणेफेक करताना दिसले होते. मॅकेनिकल लेक्चरर्सला संस्थेच्या वाटपाशी संबंधित निर्णय त्यांनी चक्क नाणेफेक करुन घेतला असल्याचा आरोप त्यांच्यावर विरोधकांनी केला होता.

शीखांचं प्राबल्य असलेल्या पंजाबात चन्नींच्या रुपात पहिला दलित मुख्यमंत्री, जाणून घ्या काय आहेत समीकरणं?

ड्रग्ज विरोधात उठवला होता आवाज

दरम्यान, काही चांगल्या गोष्टींसाठी देखील चन्नी हे ओळखले जातात. पंजाबमधून ड्रग्ज हद्दपार करण्यासाठी त्यांनी अनेकदा आवाज उठवला आहे. त्यावर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी ते सातत्याने करत होते. कॅप्टन अमरिंदर सिंग हे मुख्यमंत्री असताना त्यांनी सरकारच्या उणिवांबद्दल अनेकदा आवाज उठवला होता. नवज्योतसिंग सिद्धू प्रमाणेच ते देखील सातत्याने कॅप्टनच्या राजीनाम्याची मागणी करत होते. आता सर्वांच्या नजरा त्यांच्यावर आहेत की विधानसभा निवडणुकीपूर्वी ते मुख्यमंत्री म्हणून स्वत:ला कसं सिद्ध करतात.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT