खळबळजनक… गायक सिद्धू मूसेवालाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

मुंबई तक

अमृतसर: पंजाबचा गायक सिद्धू मुसेवाला याची रविवारी गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मानसाच्या जवाहरके गावाजवळ मूसेवालावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर, मुसेवाला याला गंभीर अवस्थेत मानसा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेत मुसेवाला यांच्यासोबत असलेले आणखी दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हल्लेखोर काळ्या रंगाच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

अमृतसर: पंजाबचा गायक सिद्धू मुसेवाला याची रविवारी गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मानसाच्या जवाहरके गावाजवळ मूसेवालावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर, मुसेवाला याला गंभीर अवस्थेत मानसा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेत मुसेवाला यांच्यासोबत असलेले आणखी दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हल्लेखोर काळ्या रंगाच्या कारमधून आल्याचे सांगण्यात येत आहे.

मूसेवाला यांना गुंडांकडून अनेकदा धमक्या आल्या होत्या. असे असतानाही पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत मूसेवाला यांच्यासह 424 व्हीआयपींची सुरक्षा काढून घेतली होती. मुसेवाला यांनी आम आदमी पार्टीच्या विजय सिंगला यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या तिकीटावर पंजाब विधानसभेची निवडणूकही लढवली होती. यावेळी विजय सिंगला यांनी मानसा मतदारसंघातून मूसेवाला यांचा 63,323 मतांनी पराभव केला होता.

अल्टो कार हिसकावून आरोपी गेले पळून

सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून अल्टो कार हिसकावून घेतल्याचे सांगितले जात आहे. या कारचा क्रमांक HR-59-7648 असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी घटनास्थळी पांढऱ्या रंगाची बोलेरो दिसल्याचेही लोकांनी सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसेवाला यांच्या हत्येत एके-47 वापरल्याचा संशय आहे.