टिकली लाव मग बोलेन! संभाजी भिडे महिला पत्रकाराला असं का म्हणाले?
टिकली लावा तरच मी बोलेन असं म्हणत संभाजी भिडे यांनी साम मराठीच्या पत्रकाराला उद्देशून म्हणाले. साम मराठीच्या प्रतिनिधी रूपाली बडवे या मंत्रालयात गेल्या होत्या. संभाजी भिडे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. काय घडली घटना? साम मराठी या वाहिनीच्या पत्रकार रूपाली बडवे या मंत्रालयात गेल्या होत्या. त्यांनी संभाजी भिडे मंत्रालयात आले होते […]
ADVERTISEMENT
टिकली लावा तरच मी बोलेन असं म्हणत संभाजी भिडे यांनी साम मराठीच्या पत्रकाराला उद्देशून म्हणाले. साम मराठीच्या प्रतिनिधी रूपाली बडवे या मंत्रालयात गेल्या होत्या. संभाजी भिडे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
ADVERTISEMENT
काय घडली घटना?
साम मराठी या वाहिनीच्या पत्रकार रूपाली बडवे या मंत्रालयात गेल्या होत्या. त्यांनी संभाजी भिडे मंत्रालयात आले होते म्हणून त्यांना गुरूजी तुम्ही कुणाची भेट घेतली हा प्रश्न विचारला. त्यावर संभाजी भिडे म्हणाले की तू आधी टिकली लाव तर तुझ्याशी बोलेन. आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री भारतमाता आहे. भारतमाता विधवा नाही, त्यामुळे तू आधी कुंकू/ टिकली लाव मग मी तुझ्याशी बोलेन असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.
संभाजी भिडेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट
शिवप्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे त्यांच्या हिंदुत्ववादी धोरणांसाठी तसंच विविध प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अशात आज त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. भाजपने त्यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींच्या नंतर संभाजी भिडे यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीवरून चर्चा होत आहेत.
हे वाचलं का?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर काय म्हणाले संभाजी भिडे?
या भेटीबाबत चर्चा होत असतानाच संभाजी भिडे यांनी मात्र आपण मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट ही सदिच्छा भेट आहे असं सांगितलं आहे. तसंच संभाजी भिडे यांनी मंत्रिमंडळाच्या कामकाजाचंही कौतुक केलं आहे. तूर्तास या भेटीमागचं कारण काय हे समजू शकलेलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही काही स्पष्ट केलेलं नाही. मात्र ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेत आली आहे.
कोण आहेत संभाजी भिडे?
संभाजी भिडे हे सांगलीत राहतात. त्यांचं वय ८० आहे. त्यांचं मूळ नाव मनोहर भिडे असं आहे. त्यांना भिडे गुरूजी किंवा संभाजी भिडे म्हणून ओळखलं जातं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्काली प्रमुख कार्यकर्ते बाबाराव भिडे हे त्यांचे काका होते. संभाजी भिडे १९८० च्या दशकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते.
ADVERTISEMENT
भीमा कोरेगाव प्रकरणात नाव आलं होतं समोर
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संस्था संभाजी भिडे यांनी स्थापन केली आहे. २०१८ मध्ये जेव्हा भीमा कोरेगाव प्रकरण घडलं त्यावेळी संभाजी भिडे यांचं नाव समोर आलं होतं. तसंच त्यांनी आत्तापर्यंत अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते अनेकदा टीकेचे धनीही ठरले आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाई झालेली नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT