Queen Elizabeth Death: कोहिनूर हिरा असलेला मुकुटाचं काय होणार? सोशल मीडियावर चर्चा
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं गुरूवारी निधन झालं. १९५२ मध्ये त्यांनी महाराणी म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यानंतर त्या तह हयात महाराणी या पदावर होत्या. सात दशकांची प्रदीर्घ कारकिर्द पार पाडल्यानंतर वयाच्या ९६ व्या वर्षी महाराणी एलिझाबेथ यांनी अखेरचा श्वास घेतला. क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांना जगभरातून श्रद्धांजली वाहिली जाते आहे. अशात त्यांचा कोहिनूर हिरा असलेल्या मुकुटाचं […]
ADVERTISEMENT

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं गुरूवारी निधन झालं. १९५२ मध्ये त्यांनी महाराणी म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यानंतर त्या तह हयात महाराणी या पदावर होत्या. सात दशकांची प्रदीर्घ कारकिर्द पार पाडल्यानंतर वयाच्या ९६ व्या वर्षी महाराणी एलिझाबेथ यांनी अखेरचा श्वास घेतला. क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांना जगभरातून श्रद्धांजली वाहिली जाते आहे. अशात त्यांचा कोहिनूर हिरा असलेल्या मुकुटाचं काय होणार ही चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
सोशल मीडियावर रंगली आहे कोहिनूरची चर्चा
क्वीन एलिझाबेथ यांचं निधन झाल्यानंतर जगभरातून त्यांना आदरांजली वाहिली जाते आहे. अशात ट्विटरवर कोहिनूर हिरा चांगलाच चर्चेत आहे. ट्विटरवर कोहिनूरवर हजारो ट्विट करण्यात आले आहेत.
महाराणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर कोहिनूर हिरा का होतोय ट्रेंड?
महाराणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर कोहिनूर हिरा ट्रेंड होण्याचं कारण आहे ते म्हणजे महाराणींचा मुकुट. राणी एलिझाबेथ यांच्या मुकुटात भारतातील प्रसिद्ध कोहिनूर हा हिरा जडवण्यात आला आहे. एवढंच नाही तर या मुकुटात दोन हजाराहून अधिक हिरे आहेत असंही सांगण्यात येतं आहे. सोशल मीडियावर कोहिनूर हिरा परत आणला जावा अशी चर्चा होते आहे.