Rahul Gandhi Speech : अदाणींवरून मोदींना घेरलं! गांधींनी चढवला हल्ला
Rahul Gandhi Todays speech in Parliament : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (budget Session) काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी अदाणी समूह आणि हिंडेनबर्ग अहवालाचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारला (Modi Government) घेरलं. राहुल गांधी यांनी गौतम अदाणी (Gautam Adani) यांचा फोटो झळकावत त्यांच्या झटपट यशाचं कारण काय आहे? असं म्हणत मोदी सरकारवर प्रश्नांचा […]
ADVERTISEMENT
Rahul Gandhi Todays speech in Parliament : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (budget Session) काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी अदाणी समूह आणि हिंडेनबर्ग अहवालाचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारला (Modi Government) घेरलं. राहुल गांधी यांनी गौतम अदाणी (Gautam Adani) यांचा फोटो झळकावत त्यांच्या झटपट यशाचं कारण काय आहे? असं म्हणत मोदी सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला. (rahul gandhi attacks on modi Government over adani hindenburg Report).
ADVERTISEMENT
लोकसभेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, “मी पदयात्रा केली. यात्रेत मला असं काही ऐकायला मिळालं की, जे मी यापूर्वी कधीही ऐकलं नव्हतं. कारण आपल्या सगळ्यांमध्ये अहंकार असतो की, स्वतःचंच म्हणणं मांडायचं. जेव्हा आम्ही 500 ते 600 किमी चालून गेल्यानंतर लोकांचा आवाज आम्हाला ऐकायला यायला लागला.”
राहुल गांधी म्हणाले, “तरुण येत होते आणि सांगत होते की आम्ही बेरोजगार आहोत. आम्ही प्रश्न विचारायचो. कुणी म्हणायचं शिक्षण झालं, कुणी म्हणायचं गाडी चालवतो. शेतकरी भेटले. त्यांनी पंतप्रधान पीक विमाबद्दल सांगितलं. पैसे भरतो, पण पैसे मिळत नाही. शेतकऱ्यांनीही असंही सांगितलं जमीन घेतली जाते पण योग्य मोबदला दिला जात नाही.”
हे वाचलं का?
“जमीन अधिग्रहण विधेयक लागू होत नाही. आदिवासी कायद्यानुसार जे दिलं जातं, ते आज हिसकावून घेतलं जात आहे, असं आदिवासींनी सांगितलं. मुख्य मुद्दा होता बेरोजगारी, महागाई आणि शेतकरी. लोकांनी अग्निवीरबद्दलही सांगितलं.”
अग्रिवीर योजनेबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले, “अग्निवीर योजना लष्कराची नाहीये, तर अजित डोवाल यांनी ती थोपवली आहे. लष्करातील लोक सांगत आहे की, हे आम्हाला हे नकोय. असा सूर उमटत आहे. राष्ट्रपतींच्या भाषणात खूप साऱ्या गोष्टी बोलल्या गेल्या, पण अग्निवीरबद्दल एकच ओळ होती. बेरोजगारी शब्द नव्हता. महागाई शब्द नव्हता. हे मला विचित्र वाटलं.”
ADVERTISEMENT
राहुल गांधी लोकसभेत म्हणाले, “मला एक नाव सगळीकडे ऐकायला मिळालं, ते होतं अदाणी. केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र ते कश्मीर. फक्त अदाणी ऐकायला मिळालं. लोक विचारायचे की, हे अदाणी कोणत्याही क्षेत्रात जातात आणि यशस्वी ठरतात. ते कधी अपयशी ठरत नाही. तरुणांनी विचारलं की, हे काय आहे, आम्हालाही शिकायचं आहे. मोदींनी सांगितलं स्टार्टअप करा. आम्हालाही अदाणींसारखं व्हायचं आहे.”
ADVERTISEMENT
“अदाणी हे कोणत्याही उद्योगात घुसतात. आधी एकदोन उद्योग करायचे. आता ते आठ ते दहा क्षेत्रात काम करतात. विमानतळ, डेटा सेंटर्स, सिमेंट, सोलर एनर्जी, विंड एनर्जी, एअरोस्पेस आणि डिफेन्स, कंझ्युमर फायनान्स, पोर्ट… असाही प्रश्न विचारला की, अदाणींचं नेटवर्थ 2014 पासून 2022 पर्यंत 8 बिलियन डॉलरवरून 140 बिलियन डॉलर कसं झालं? 2014 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी आली. त्यात ते 609 व्या क्रमांकावर होते”, असं राहुल गांधी म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “माहिती नाही, जादू झाली आणि दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले. मला लोकांनी विचारलं की, हिमाचलमध्ये सफरचंदाचा मुद्दा येतो तर अदाणी, कश्मिरात सफरचंदाचा मुद्दा आला की अदाणी, पोर्ट अदाणी, विमानतळ अदाणी, रस्ते अदाणी… लोकांनी विचारलं की, अदाणींच्या यशाचं कारण काय?”, असा सवाल करत राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केलं.
“अदाणी इतक्या क्षेत्रात ते कसे घुसले, त्यांनी इतकं यश कसं मिळवलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं भारताच्या पंतप्रधानांसोबत काय आणि कसं नातं आहे?”, असं म्हणत राहुल गांधींनी अदाणी आणि मोदी यांचं जुनं छायाचित्र सभागृहात दाखवलं.
राहुल गांधी पुढे म्हणाले, “मी विचार केला की, राष्ट्रपतींच्या भाषणावर बोलताना अदाणी आणि मोदी यांच्यातील नातं सांगू. अदाणी आणि मोदी एकत्र येण्याची सुरूवात खूप वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा नरेंद्र मोदी गुजतराचे मुख्यमंत्री होते. जेव्हा मोदींना प्रश्न विचारले जातात, तेव्हा एक उद्योगपती मोदींच्या खांद्याला खांदा लावून उभा असतो.”
राहुल गांधी म्हणाले, “नरेंद्र मोदी किती वेळा गौतम अदाणी यांच्यासोबत परदेशी दौऱ्यावर गेले? अदाणींना कंत्राट मिळाल्यानंतर किती देशांचे दौरे केले आणि मागील 20 वर्षात अदाणींनी भाजपला किती देणगी दिली? कधी काळी मोदी अदाणींच्या विमानातून प्रवास करायचे, आता अदाणी पंतप्रधानांच्या विमानातून प्रवास करतात.”
“मोदी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जातात आणि अदाणींना कर्ज मिळालं”
केंद्र सरकार आणि मोदींवर हल्ला चढवत राहुल गांधी म्हणाले,”पंतप्रधान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जातात आणि इकडे अदाणींना एसबीआयचं कर्ज मिळतं. त्यानंतर मोदी बांगलादेश दौऱ्यावर जातात आणि 1500 मेगावॅट वीज निर्मिती प्रोजेक्ट अदाणींना मिळतो. 2020 मध्ये चेअरमन ऑफ श्रीलंका संसदेला सांगतात की राष्ट्रपती राजपक्षेंनी सांगितलंय की भारताचे पंतप्रधान म्हणतात की प्रोजेक्ट अदाणींना द्यायचा आहे,” असं म्हणत गांधींनी मोदींवर निशाणा साधला.
राहुल गांधी यांचं संसदेतील भाषण ऐकण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT