जिवाची बाजी लावून रूळावरच्या मुलाचे प्राण वाचवणाऱ्या मयुर शेळकेंचा रेल्वे मंत्रालयाकडून सन्मान

मुंबई तक

नुकतंच काही दिवसांपूर्वी रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या लहानग्या मुलाची सुटका करणारे देवदूत मयुर शेळके यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. मयुर शेळके यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुळावर पडलेल्या चिमुकल्याचे प्राण वाचवले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्येही कैद झाली. तर मयुर यांच्या धाडसाची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने त्यांना 50 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. मध्य रेल्वेवरील वांगणी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नुकतंच काही दिवसांपूर्वी रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या लहानग्या मुलाची सुटका करणारे देवदूत मयुर शेळके यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. मयुर शेळके यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुळावर पडलेल्या चिमुकल्याचे प्राण वाचवले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्येही कैद झाली. तर मयुर यांच्या धाडसाची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने त्यांना 50 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

मध्य रेल्वेवरील वांगणी स्थानकावर शनिवारी संध्याकाळच्या सुमारास एक मुलगा तोल जाऊन तो मुलगा ट्रॅकवर पडला. यावेळी तिथे असलेल्या पॉईंटमन मयुर शेळके यांनी ही घटना पाहिली आणि क्षणाचाही विलंब न लावता त्याने मुलाच्या दिशेने धाव घेत मुलाला उचलून प्लॅटफॉर्मवर ठेवलं. त्याचप्रमाणे ते स्वतःही तातडीने प्लॅटफॉर्मवर चढले. यानंतर रेल्वेने त्यांना बक्षिस जाहीर केलं असून जावाकडूनही त्यांना नवी कोरी मोटरसायकल भेट म्हणून देण्यात येणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने यासंदर्भात ट्विट केलंय. या ट्विटमध्ये नमूद केल्यानुसार, “मध्य रेल्वेच्या वांगणी स्टेशनवर पॉईंटमन मयुर शेळके यांनी चिमुकल्याचं प्राण वाचवले. मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी आपला जीव धोक्यात घातला. आम्ही त्यांच्या धाडसाला आणि कर्तव्यदक्षतेला सलाम करतो.”

त्यासोबत पियुष गोयल यांनाही ट्विट केलंय. ते म्हणतात, “मयूर शेळके यांच्या कामगिरीचं मोल बक्षीस किंवा पैशांमध्ये करता येण्यासारखं नाही. मात्र कर्तव्य करत असताना स्वतःच्या कार्याद्वारे मानवतेला प्रेरणा दिल्याबद्दल त्यांचा सन्मान केला जाईल.”

दरम्यान क्लासिक लीजेंड्सचे प्रमुख अनुपम थरेजा यांनी मयूरचा व्हिडीयो ट्विटरवर शेअर केला आहे. तसंच मयुरला त्यांच्या शौर्यासाठी नवीन जावा मोटसायकल देण्याचंही त्यांनी म्हटलंय. महिंद्रा अँड महिंद्रा ब्रँडकडून जावा मोटरसायकल पुन्हा बनवण्यासा सुरुवात केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp