नागपुरात मनसेचा लढा भाजपविरोधात; राज ठाकरेंनी फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात थोपटले दंड
राज्यात महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठीही मोर्चेबांधणी सुरू झालीये. राजकीय धामधुमीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी फडणवीसांच्या बाल्लेकिल्ल्यात चक्क भाजपविरोधात दंड थोपटले. देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांनी आव्हान दिलं आहे. राज ठाकरे नागपूरच्या पत्रकार परिषदेत काय म्हणाले? ‘दोन वर्षांच्या लॉकडाऊननंतर, जेव्हा माणसं एकमेकांना भेटायला लागली. […]
ADVERTISEMENT
राज्यात महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठीही मोर्चेबांधणी सुरू झालीये. राजकीय धामधुमीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी फडणवीसांच्या बाल्लेकिल्ल्यात चक्क भाजपविरोधात दंड थोपटले. देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांनी आव्हान दिलं आहे.
ADVERTISEMENT
राज ठाकरे नागपूरच्या पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
‘दोन वर्षांच्या लॉकडाऊननंतर, जेव्हा माणसं एकमेकांना भेटायला लागली. गर्दीची बंधनं उठल्यानंतर पहिल्यांदाच विदर्भात येतोय. चंद्रपूर आणि अमरावतीला जाणार आहे. दोन वर्ष सत्ताधाऱ्यातील एक-दोनजण, विरोधी पक्षांतील एक-दोनजण आणि पत्रकार सोडून सगळेच गप्प होते. जगभरातील लोक स्वतःच्या विवंचनेत होते’, असं राज ठाकरेंनी सांगितलं.
राज ठाकरेंनी नागपूर मनसेची कार्यकारिणी केली बरखास्त
राज ठाकरेंनी नागपूर जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त केल्याची माहिती दिली. ‘बंधनं उठल्यानंतर गुढीपाडवा मेळावा झाला. तिथून बोलण्याला सुरूवात झाली. राजकारणातील विषयांना हात घालण्यास सुरूवात झाली. ठाणे, संभाजीनगरच्या सभा सर्वांनी पाहिल्या असतील. मी आज विदर्भात आलोय. नागपुरातील झाडाझडती बऱ्याच वर्षांपासून बाकी होती. पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालं. त्यातून नागपूर शहर, जिल्ह्यातील सेल आहेत. शहरातील सर्व पद बरखास्त करतोय. घटस्थापनेला नवीन कार्यकारिणी जाहीर करेन’, असं राज ठाकरेंनी सांगितलं.
हे वाचलं का?
वेदांता फॉक्सकॉन प्रोजेक्टसाठी कंपनीकडे पैसे मागितले गेले?; राज ठाकरे काय म्हणाले?
‘अविनाश जाधव, संदीप देशपांडे, अनिल शिदोरे हे २८ सप्टेंबर परत दौऱ्यावर येतील आणि सर्व सेलची बांधणी करतील. नवरात्री झाल्यानंतर कोल्हापूर मार्गे कोकणात जाणार. त्यानंतर परत नागपूरला येणार आहे’, अशी माहितीही त्यांनी दिलीये.
‘काही चुकीच्या गोष्टी सुरू होत्या. पक्षाला १६ वर्ष झाली आहेत. ज्या प्रकारे नागपूरमध्ये पक्ष दिसायला होता, जसा इतर शहरांमध्ये दिसतो तसा दिसत नाहीये. उमेद असलेले तरुण-तरुणींना संधी देणं आवश्यक आहे’, अशी भूमिका त्यांनी मांडली.
ADVERTISEMENT
नागपुरात मनसेचा लढा भाजपविरोधात
‘प्रत्येकजण ज्यावेळी मोठा होतो, तेव्हा तो प्रस्थापितांच्या विरोधात लढा देऊनच उभा होतो. पूर्ण वाक्य असं होतं. हा विदर्भ पूर्वी काँग्रेसचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. बाल्लेकिल्ल्यात लढा देऊन तो भाजपचा झाला असेल, तर तो सत्ताधाऱ्यांच्या विरोधात केलेल्या संघर्षातून त्यांच्या हाती ती गोष्ट आलीये. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रस्थापितांच्या विरोधातच लढावं लागतं. जर नागपुरात ते (भाजप) प्रस्थापित असतील, तर त्यांच्याविरोधातच लढावं लागेल’, असं सांगत राज ठाकरेंनी मनसेची लढाई भाजपविरोधात असल्याचं स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT