‘प्रत्येक प्रकल्प गुजरातलाच जातोय’, राज ठाकरेंचा मोदींना सल्ला, करुन दिली जबाबदारीची जाणीव
“पंतप्रधानांचा विचार हा विशाल असला पाहिजे. तो सगळ्या देशाचा असला पाहिजे”, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टाटा एअरबस प्रोजेक्ट गुजरातला गेल्याबद्दलची भूमिका मांडली. पंतप्रधान मोदींना राज ठाकरेंनी जबाबदारीची जाणीवही करून दिली. मुंबईत माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंनी टाटा एअरबस प्रोजेक्टबद्दल भूमिका मांडली. राज ठाकरे म्हणाले, “बाहेर गेला म्हणजे गुजरातमध्ये गेला. माझी मागची […]
ADVERTISEMENT

“पंतप्रधानांचा विचार हा विशाल असला पाहिजे. तो सगळ्या देशाचा असला पाहिजे”, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टाटा एअरबस प्रोजेक्ट गुजरातला गेल्याबद्दलची भूमिका मांडली. पंतप्रधान मोदींना राज ठाकरेंनी जबाबदारीची जाणीवही करून दिली.
मुंबईत माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंनी टाटा एअरबस प्रोजेक्टबद्दल भूमिका मांडली. राज ठाकरे म्हणाले, “बाहेर गेला म्हणजे गुजरातमध्ये गेला. माझी मागची सगळी भाषणं काढून बघितली तर माझं पहिल्यापासूनच मत असंच होतं की पंतप्रधान हे देशाचे आहेत. त्यामुळे प्रत्येक राज्य त्यांच्यासाठी समान मुलांसारखं असलं पाहिजे. महाराष्ट्रातील हा प्रकल्प बाहेर गेला असता आणि तो आसामला गेला असता, तर मला वाईट नसतं वाटलं.”
“प्रकल्प गुजरातला गेलाय, शेवटी देशातच आहे तो. पण, वाईट या गोष्टीचं वाटतंय की, जो प्रकल्प येतोय आणि बाहेर पडतोय तो गुजरातलाच जातोय. मला असं वाटतंय की, पंतप्रधानांनी स्वतः याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट गुजरातकडे जात असेल अन् राज ठाकरे ज्यावेळी महाराष्ट्राबद्दल बोलतो तेव्हा त्याला संकुचित म्हणण्यासारखं काय आहे?”
“पंतप्रधानांचा विचार हा विशाल असला पाहिजे. तो सगळ्या देशाचा असला पाहिजे. प्रत्येक राज्य मोठं झालं पाहिजे. प्रत्येक राज्यात उद्योगधंदे आले पाहिजे. तिथल्या लोकांना घर सोडून जाण्याची गरज पडू नये. त्यातून देशाचाच विकास होईल.”