मविआची दोन मतं कमी, बविआला फायदा होणार? ; हितेंद्र ठाकूर म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना ईडीने मतदानासाठी परवानगी नाकारल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची तीन मते महाविकास आघाडीसाठी महत्वाची ठरणार आहेत. आमची मतं घेण्यासाठी आमदार, माजी खासदार हे आमच्याकडे आले मात्र जवळच्या मंत्री मंडळातला एकही मंत्री भेटीसाठी आला नसल्याचे ठाकुरांनी सांगितले. उद्या ४ वाजे पर्यंत मतदान आहे त्यामुळे अखेरच्या क्षणी आम्ही गुप्त मतदान करणार असल्याचे ठाकूर म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

उद्या राज्यसभेसाठी मतदान होणार आहे. अजूनही महाविकास आघाडी आणि भाजपची आमदारांची जुळवाजुळव सुरु आहे. बहुजन विकास आघाडीचे राज्यात तीन आमदार आहेत त्यामुळे त्यांची मते निर्णायक ठरणाह आहेत. इथे एका-एका मतासाठी पक्ष संघर्ष करत आहेत. आमदारांचा घोडेबाजार होऊ नये म्हणून आमदारांना हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी सात उमेदवार मैदानात आहेत. शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडीक यांच्यात सहाव्या जागेसाठी खरा सामना रंगणार आहे.

राज्यात आगामी काळात विधान परिषदेचीही निवडणूक होऊ घातलेली आहे. विधान परिषदेसाठी सर्व पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. येत्या २० तारखेला विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे. राज्यसभेची सहावी जागा कोण जिंकेल याचे चित्र उद्या चार पर्यंत स्पष्ट होणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT