रामदास आठवलेंच्या मागणीमुळे एकनाथ शिंदेंच्या खासदाराचं टेन्शन वाढलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Ramdas Kadam Demand : नागालँडमध्ये झालेल्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आरपीआय (RPI) पक्षाचे दोन आमदार निवडून आलेत. त्यामुळे त्यांच्या पक्षात उत्साहाचं वातावरण आहे. त्यात त्यांचा आत्मविश्वास देखील वाढला आहे. त्यामुळे आठवलेंनी थेट महाराष्ट्रातील (Maharashtra) अशा मतदारसंघाची मागणी केली आहे, ज्यामुळे भविष्यात शिंदेंच्या शिवसेनेची डोकेदुखी वाढू शकते. त्यांनी थेट शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं सांगून टाकलं आहे. (Ramdas Athawale’s demand increased the headache of Eknath Shinde’s MP)

ADVERTISEMENT

आगामी निवडणुकीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जागावाटपावरून पेच निर्माण होण्याचं शक्यता आहे. त्याचे संकेत आतापासूनच दिसायला लागलेत. शिर्डीत लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे खासदार हे सदाशिव लोखंडे आहेत, जे शिंदेच्या शिवसेनेचे आहेत. मात्र त्यांच्या शिर्डीतील लोकसभा मतदारसंघावर रामदास आठवलेंनी दावा केलाय.

‘आता पडणार नाही तर लढणार’

नुकतीच एक पत्रकार परिषद पार पडली. त्यात भाजप नेत्यांनी विश्वास दाखवल्यास पुन्हा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचं रामदास आठवले यांनी बोलून दाखवलं आहे. ते म्हणाले की, मागच्या निवडणुकीत मी शिर्डीतून पराभूत झालो होतो. मात्र आता माझी पुन्हा शिर्डीतूनच निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. आगामी काळात त्यांनी शिर्डीत पक्षाचं अधिवेशन देखील बोलावलंय. या अधिवेशनाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हजर राहणार असल्याचं बोललं जात आहे.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात अडकले: रामदास आठवले

आगामी लोकसभेत तिकीट वाटपावरून पक्षश्रेष्ठींपुढे मोठा पेच

केंद्रात भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची युती आहे. तसेच राज्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती असून खासदार सदाशिव लोखंडे युतीकडून विद्यमान खासदार आहेत. रामदास आठवलेंच्या वक्तव्याने आगामी लोकसभेत तिकीट वाटपावरून पक्षश्रेष्ठींपुढे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

रामदास आठवले म्हणाले, भाजपने राज ठाकरेंच्या नादी लागू नये

ADVERTISEMENT

शिर्डी लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचे दिर्घकाळ वर्चस्व होते

2009 सालच्या निवडणुकीदरम्यान आठवलेंची आरपीआय राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत होती. त्यावेळी त्यांना शिर्डीतून उमेदवारी देण्यात आली होती. त्यादरम्यान शिवसेनेच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी त्यांचा पराभव केला होता. विखे पाटलांनी मला सहकार्य केलं असतं तर मी निवडून आलो असतो, अशा भावना आठवलेंनी बोलून दाखवल्या. शिर्डी लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचे दिर्घकाळ वर्चस्व होते.

काँग्रेसचे नेते बाळासाहेब विखे पाटील हे या मतदारसंघातून नऊ वेळा खासदार झाले होते. मात्र मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर इथे 2009, 20014 आणि 2019 असे सलग तीनवेळा शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. 2019 साली सदाशिव लोखंडे यांनी शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवत काँग्रेसच्या उमेदवाराला धूळ चारली होती. मात्र आठवलेंच्या इच्छेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचे टेन्शन वाढणार असल्याची चर्चा आहे.

रामदास आठवले यांची राज्यसभेत गाजली कविता

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT