RBI ची कारवाई, लोकांचे लाखो रुपये बँकेत अडकले, रांगेतील लोकांच्या वेदनादायी कहाण्या
बँकेत पैसे अडकलेल्या एका महिलेनं सांगितलं, की "पुढच्या महिन्यात माझ्या मुलीच्या घरी एक कार्यक्रम आहे आणि मला त्यासाठी पैशांची गरज आहे. आम्हाला याबद्दल कोणतीही कल्पना देण्यात आली नाही. बँकेबाहेर रांग पाहिल्यानंतर मी इथे आले तेव्हा मला कळलं."
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

न्यू इंडिया को-ऑपरेटीव्ह बँकेवर RBI ची कारवाई

लाखो लोकांची आयुष्यभराची जमापूंजी अडकली
सहकारी बँकांमध्ये तुमचे कष्टाचे पैसे जमा करणं पुन्हा एकदा ग्राहकांसाठी धोकादायक ठरलं आहे. रिझर्व्ह बँकेने 'न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्र'मध्ये पैशांच्या व्यवहारांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. ही कारवाई झाल्याची बातमी कळताच, मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेल्या या बँकेच्या शाखांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी जमली. मात्र, ग्राहक शाखेत पोहोचल्यावर तिथे त्यांना सांगण्यात आलं की, फक्त लॉकरमधून व्यवहार करण्याची परवानगी आहे. जिथे कष्टायचा पैसे बचत म्हणून जमा केलाय, तिथे आज त्यांना पैसे काढण्यास नकार दिला जातोय यावर अनेक लोकांचा विश्वास बसत नाहीये. त्यामुळे हजारो लोक सध्या चिंतेत आहेत. दरम्यान, आता या प्रकरणात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (New India Cooperative Bank News)
न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक प्रकरणात मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या कार्यवाहक सीईओ देवर्षी घोष यांच्या तक्रारीवरून, महाव्यवस्थापक आणि लेखा प्रमुख हितेश मेहता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 122 कोटी रुपयांच्या रिझर्व्ह फंड्सचा अपहार केल्याच्या आरोपाखाली हितेश मेहता यांच्यावर फौजदारी भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा >> Mumbai Airport : मुंबई विमानतळाचे अधिकारी हादरले... दुबईहून आलेल्या तस्करांच्या टोळीकडे सापडलं 7 किलो सोनं
मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयने कडक कारवाई केली आहे. नवीन कर्ज देणे, नवीन ठेवी स्वीकारणे आणि पैसे काढणे या सर्व व्यवहारांवर बंदी घातली आहे.हे निर्बंध पुढच्या 6 महिन्यांसाठी लागू असणार आहेत. बँकेची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.
बँकांच्या शाखांबाहेर ग्राहकांची गर्दी
आरबीआयच्या या निर्णयानंतर मुंबई आणि ठाण्यातील बँक शाखांबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी जमली. अनेक खातेदारांनी त्यांचे पैसे काढू देण्याची मागणी करत, संताप करण्यास सुरुवात केली. काही ठेवीदारांच्या 40 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मुदत ठेवी (एफडी) अडकल्या आहेत, ज्यामुळे त्यांची चिंता आणि संताप वाढतोय.