RBI Monetary Policy : कर्जदारांवरील EMI चा भार वाढणार! रिझर्व्ह बँकेने रेपो दर वाढवला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

RBI Monetary Policy गृहकर्ज, वाहन कर्जासह सर्व प्रकारच्या कर्जांच्या हप्त्यात वाढ होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महिनाभराच्या अंतरानेच दुसऱ्यांदा रेपो रेटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण निर्धारण समितीच्या (एमपीसी) बैठकीनंतर ही घोषणा केली.

ADVERTISEMENT

रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण निर्धारण समितीच्या (एमपीसी) सोमवारपासून तीन दिवसांची बैठक झाली. या बैठकीनंतर आज गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आल्याच्या निर्णयाची माहिती दिली. रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये ४० बिंदूंची वाढ केली जाईल, अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात रिझर्व्ह बँकेने ५० बिंदूंची म्हणजे ०.५० टक्क्यांची वाढ केलीये.

रेपो रेटमध्ये आरबीआयने ०.५० टक्क्यांची वाढ केल्याने आता रेपो रेट ४.४० टक्क्यांवरून ४.९० टक्क्यांवर पोहोचला आहे. एमपीसी म्हणजेच पतधोरण निर्धारण समितीच्या सहा सदस्यांनी रेपो रेट वाढण्याच्या बाजून मतदान केलं.

हे वाचलं का?

पतधोरण जाहीर करत असताना गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महागाईच्या मुद्द्यावर भाष्य केलं. रशिया आणि युक्रेन (Russo-Ukraine War) यांच्यातील युद्धामुळे पुरवठा साखळी बिघडली आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे भारत दररोज आव्हानांचा सामना करत आहे. यामुळे जगभरात महागाई वाढली असल्याचं त्यांनी सांगितलं.

८ एप्रिल रोजी झालेल्या पतधोरण बैठकीत रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट कायम ठेवण्यात आले होते. त्यानंतर देशातील वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयने ४ मे रोजी झालेल्या पतधोरण बैठकीत रेपो रेटमध्ये ०.४० बेसिक पॉईंटची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता ०.५० पॉईंटची वाढ करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

रेपो रेटमुळे व्याजदर का वाढतात?

ADVERTISEMENT

रेपो रेट म्हणजे आरबीआय बँकांना ज्या व्याजदराने कर्ज देते तो दर. सध्या तरी हा दर ४.४० टक्के आहे. ०.५० टक्क्यांची वाढ करण्यात आल्याने तो आता ४.९० टक्के होणार आहे.

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट वाढवण्याची अंदाज आधीच व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे काही बँकांनी आधीच व्याजदरात वाढ केली. रिझव्‍‌र्ह बँकेने मे महिन्यात रेपो दरात ४० बेसिक पॉईंटची वाढ केल्यापासून एचडीएफसी बँकेने कर्जावरील व्याजदरात ०.६० टक्क्यांची वाढ केली आहे.

कॅनरा बँकेनंही कर्जदरात वाढ करून तो ७.४० टक्क्यांवर नेला आहे. हे व्याजदर मंगळवारपासूनच लागू झाले आहेत. गेल्या आठवड्यातच पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ इंडियानंही व्याजदरात वाढ केलेली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT