हॅपी बर्थडे शाहरुख खान!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

९० च्या दशकात ऐन तारुण्यात आलेली पोरं वेगळ्या प्रकारचे बंडखोर आहेत… नुकतंच आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारलेला देश … सिंगल नॅशनल ब्रॉडकास्टर दूरदर्शनच्या एकहाती वर्चस्वाला पर्याय देत नवीन मध्यमवर्गीय घरात केबल/ सॅटेलाईट वाहिन्यांचा प्रवेश होऊ लागला होता. पण हा बदल फक्त सोशालिस्ट इकॉनॉमी ते ग्लोबलायझेशन इतकाच नव्हता.. हा बदल मध्यमवर्गाच्या जीवनमानात त्यांच्या विचारातही झपाट्याने होत होता. त्याच्या महत्वाकांक्षांच्या कक्षा रुंदावत होत्या. हा बदल सर्वाधिक जाणवला अर्थातच मुख्य प्रवाहातल्या हिंदी सिनेमात, अर्थात बॉलिवूड मध्ये !

ADVERTISEMENT

आधी राज-देव-दिलीप यांच्या सिनेमावर असलेला नेहरुवीयन सोशालिसमचा प्रभाव, नंतर याच प्रभावाने हताश झालेली पिढी – बेरोजगारी,आणीबाणी , प्रस्थापित व्यवस्थे विरोधात बंड करणारी पिढी आली आणि याचाच प्रभाव अँग्री यंग मॅन च्या माध्यमातून सिनेमात दिसला … यानंतरचं महत्वाचं स्थित्यंतर दिसलं ते आर्थिक उदारीकरणानंतर… आणि याचा महत्वाचा चेहरा होता शाहरुख खान … मध्यमवर्गाच्या नैतिकतेच्या बदलत्या व्याख्या , जुन्या पिढीच्या एकदम ब्लॅक आणि व्हाईट मोरॅलीटी पासून चांगल्या-वाईटच्या मधोमध ग्रे शेड शोधणारा अँटी हिरो बाजीगर मध्ये आपण शाहरुख च्या रुपात पाहिला… सुरुवातीला खटकला असला तरीही भावला… असाच यशामागे धावणारा राजू बन गया जंटलमन मधला राज माथूर , किंवा आपलं प्रेम असणारी अँना आपल्याला मिळावी म्हणून कारस्थानं करणारा , धादांत खोटं बोलणारा, पास होण्यासाठी खोटी मार्कशीट मिळवणारा कभी हां, कभी ना मधला सुनील … बदलत्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत , हा बदल कसा स्वीकारायचा हा मध्यमवर्गाचा गोंधळ , moral struggle हाच शाहरुखच्या सिनेमाचा फोकल पॉईंट होता.

हे वाचलं का?

त्याच्या सोबत एक पिढी नव्या morality कडे पाहत होती. हा शिफ्ट फक्त जनरेशन चा नव्हता, हा विचारांचा, महत्वाकांक्षांमधला शिफ्ट होता, पारंपरीक विचारात वाढणाऱ्या स्मॉल टाऊन मिडील क्लासला नवीन स्वप्नं दाखवत होता… morality च्या भानगडीत तो कधी पडला नाही … जे हवं ते मिळवायचं , मार्ग मग कुठला का असेना – नैतिकतेला आव्हान देणारा त्याचा डर मधला अँटी हिरो , येस बॉस मधला बॉसचा हरकाम्या गो गेटर हिरो वादग्रस्त असूनही आमच्या पिढीला अपील झाला … छोट्या शहरातील आमच्या तरुणाई सोबतच हाच शाहरुख ग्लोबल डायसपोरा ला ही तितकाच अपील करत होता. मध्यमवर्गीय मूल्य जपणारा, भारतीय संस्कृतीचं परदेशात स्थायिक झालेल्या पिढीला असणारं अप्रूप त्याचा NRI हिरो जितका चकचकीत होता तितकाच अपिलिंग…

ADVERTISEMENT

अर्थात त्याचे सर्व सिनेमे ग्रेट आहेत असं अजिबात नाही… पण ९० मध्ये खऱ्या अर्थाने बदलत्या भारताचं प्रतिबिंब त्याच्या अनेक सिनेमात दिसतं…शाहरुख बद्दल बोलण्यासारखं खूप आहे , पण आज जे सुचलं ते शेयर करावंसं वाटलं… शाहरुख आज ५५ वर्षांचा झालाय … त्याला फॉलो करणारी आमची पिढीही चाळीशी कडे सरकलीये ! तो आवडो न आवडो , शाहरुख शी आमचं वेगळं नातं आहे … बस मधून त्याचे सिनेमे पाहणारी आमची पिढीतले अनेक आज कार मध्ये त्याची गाणी ऐकतांना भूतकाळात रमतात ! शाहरुख ने आम्हाला काय दिलंय हे नेमकं सांगणं कठीण आहे, पण आमच्यातल्या अनेकांनी त्याच्याकडुन खूप घेतलंय !

ADVERTISEMENT

Happy Birthday #Shahrukh_Khan !!

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT