Pm Narendra Modi यांच्या वाढदिवशी देशभरात रेकॉर्डब्रेक लसीकरण
आज संपूर्ण देश पंतप्रधान मोदींचा 71वा वाढदिवस साजरा करत आहे (PM Narendra Modi 71th Birthday). या निमित्ताने देशात विक्रमी लसीकरणाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी दुपारी दीड वाजेपर्यंत देशात कोरोना लसीचे एक कोटी डोस देण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यात आले. तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 2 कोटींचा टप्पा पार करण्यात आला. तर […]
ADVERTISEMENT

आज संपूर्ण देश पंतप्रधान मोदींचा 71वा वाढदिवस साजरा करत आहे (PM Narendra Modi 71th Birthday). या निमित्ताने देशात विक्रमी लसीकरणाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी दुपारी दीड वाजेपर्यंत देशात कोरोना लसीचे एक कोटी डोस देण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यात आले. तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 2 कोटींचा टप्पा पार करण्यात आला. तर नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार देशभरात रात्री 9.30 पर्यंत 2.25 कोटी जणांचा लसीकरण करण्यात आले. ANI या संदर्भातले ट्विट केले आहे.
#COVID19 | India has administered over 2.25 crore daily vaccinations till 9.30 pm today.
(Data source: CoWIN) pic.twitter.com/7whmS972QN
— ANI (@ANI) September 17, 2021
मिळालेल्या आकडेवारीनुसार, देशात 21 जून रोजी 88.09 लाख आणि 27 ऑगस्ट रोजी 1.03 कोटी विक्रमी लसीकरणाचा पल्ला गाठण्यात आला होता. आता पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त विक्रमी लसीकरणाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या निमित्ताने भारतीय जनता पार्टी 20 दिवसांचा मेगा इव्हेंटही आयोजित करत आहे. या कार्यक्रमाला सेवा आणि समर्पण अभियान असे नाव देण्यात आले आहे. आजपासून सुरू झालेली ही मोहीम 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

दुपारी 1:30 पर्यंत 1 कोटीचा आकडा पार










