एअर इंडिया कर्मचाऱ्याला मारहाण : माजी खासदार रविंद्र गायकवाडांना दिलासा

मुंबई तक

बिजनेस क्लासचं तिकीट दिलं नाही म्हणून विमानात एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केल्याप्रकरणात शिवसेनेचे माजी खासदार रविंद्र गायकवाड यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. २०१७ रोजी घडलेल्या घटनेनंतर गायकवाड यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, खोटी माहिती आणि पुरावे नष्ट करणे आणि मारहाण या कलाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात दिल्लीतील कोर्टाने गायकवाड यांची सदोष […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

बिजनेस क्लासचं तिकीट दिलं नाही म्हणून विमानात एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केल्याप्रकरणात शिवसेनेचे माजी खासदार रविंद्र गायकवाड यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. २०१७ रोजी घडलेल्या घटनेनंतर गायकवाड यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, खोटी माहिती आणि पुरावे नष्ट करणे आणि मारहाण या कलाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात दिल्लीतील कोर्टाने गायकवाड यांची सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न आणि पुरावे नष्ट केल्याच्या कलमातून मुक्तता केली आहे. यापुढे गायकवाड यांच्याविरुद्ध मारहाणीचा खटला चालणार आहे.

मारहाण केल्याच्या आरोपात रविंद्र गायकवाड सकृतदर्शनी दोषी असल्याचं दिसत असून या IPC 355 अंतर्गत त्यांच्यावर खटला चालवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे गायकवाड यांच्यासाठी हा दिलासा मानला जात आहे.

१० दिवसांसाठी चौकशी स्थगित करा ! परमबीर सिंग प्रकरणात सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारलं

काय आहे हे प्रकरण ?