राज्यात निर्बंध अधिक कडक करणार, नियोजन सुरू आहे – राजेश टोपे
मुंबई तक: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. अशातच काही ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करताहेत. अशा परिस्थितीत गर्दी होण्याच्या ठिकाणी निर्बंद अधिक कडक करण्याबाबत नियोजन सुरू आहेत आणि त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. आरोग्य मंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. यावेळी टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार […]
ADVERTISEMENT

मुंबई तक: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. अशातच काही ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करताहेत. अशा परिस्थितीत गर्दी होण्याच्या ठिकाणी निर्बंद अधिक कडक करण्याबाबत नियोजन सुरू आहेत आणि त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आरोग्य मंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. यावेळी टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊनबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्याबाबत चर्चा मात्र सुरू असते. तसंच लोकं गर्दी करणं टाळत नसल्यामुळे निर्बंध अधिक करण्याबाबतची पावलं राज्य सरकार उचलणारच आहे अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली. तसंच गर्दी टाळावी हाच त्यामागचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याबरोबरच गर्दी होण्याच्या ठिकाणी निर्बंध कडक कऱण्याबाबत नियोजन सुरू असल्याची माहिती त्यांन यावेळी दिली.
लॉकडाउन बाबात कोणताही निर्णय झालेला नाही. चर्चा सुरू असते. निर्बंध अधिक कडक करण्याबाबतची पावलं राज्य सरकार उचलणारच आहे. गर्दी टाळावी हाच त्या मागचा दृष्टीकोन आहे. गर्दी होण्याच्या ठिकाणी निर्बंध कडक करण्याबाबत नियोजन करत आहोत. ते करण्यासाठी आता प्रयत्न करणार आहोत.