महसूल मंत्री बाळासाहेब थोरात कोरोना पॉझिटिव्ह, संपर्कात आलेल्यांना केलं काळजी घेण्याचं आवाहन
महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. प्राजक्त तनपुरे, वर्षा गायकवाड यांच्या पाठोपाठ आता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही कोरोना झाला आहे. बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करून यासंदर्भातली माहिती दिली आहे. काय म्हटलं आहे बाळासाहेब थोरात यांनी? माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. प्राजक्त तनपुरे, वर्षा गायकवाड यांच्या पाठोपाठ आता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही कोरोना झाला आहे. बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करून यासंदर्भातली माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे बाळासाहेब थोरात यांनी?
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी.
हे वाचलं का?
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे.
मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे.
माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) December 30, 2021
आजच भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला असल्याचं त्यांनी ट्विट करून सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांत जे माझ्या संपर्कात होते त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असंही आवाहन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे अधिवेशनातही हजर होते.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या मुलाला लग्नाला उपस्थिती लावली होती. राधाकृष्ण विखे पाटील हे त्या लग्नात विनामास्क दिसले होते. या लग्न सोहळ्यात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे इतर नेतेही उपस्थिती होते.
ADVERTISEMENT
Covid 19: महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागणार का? अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…
ADVERTISEMENT
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोना झाला. वर्षा गायकवाड यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. त्या देखील हिवाळी अधिवेशनात हजर होत्या. कालच प्राजक्त तनपुरे यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. प्राजक्त तनपुरे यांनी आणि वर्षा गायकवाड यांनीही आपल्या संपर्कात आलेल्या कोरोनाची चाचणी करून चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच काळजी घेण्याचंही आवाहन केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय म्हटलं आहे?
मुंबईसह राज्यात वेगाने पसरणाऱ्या कोरोनाला गांभीर्याने घ्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजही केले. ते म्हणाले, ‘सुप्रियाच्या तर सगळ्या घराला कोरोनाची लागण झाली आहे. अजूनही अनेक लोक मास्क न घालता फिरतायत. बाबांनो माझी विनंती आहे, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाची लाट येणार आहे. खूप काळजी घेण्याची गरज आहे. अधिवेशनात मी सभागृहात आल्यापासून ते घरी जाईपर्यंत मास्क लावलेला असतो. बोलतानाही काढत नाही. आपल्याला नियम पाळावेच लागणार आहेत. आपणच नियम पाळणार नाही तर नियम सांगण्याचा अधिकार मला नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाचं स्वागत बाहेर न करता, घरातच करा.’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT