राणे RSS च्या गणवेशात; भाजपवासी झालेल्या इतर दोन आमदारांनीही पाळली संघाची शिस्त

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पणजी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक डॉ. मोहन भागवत यांच्या कार्यक्रमात मागच्या काही वर्षात भाजपमध्ये प्रवेश केलेले काही आमदार चक्क संघाच्या गणवेशात दिसून आले. हे दृश्य बघून उपस्थित इतर स्वयंसेवक आणि लोकांनी आश्चर्य व्यक्त करत भुवया उंचावल्या. सर्वांच्याच नजरा त्यांच्यावरती खिळल्या होत्या. तसंच भाजपवासी झालेल्या या आमदारांना संघाची शिस्त लागल्याची भावनाही व्यक्त केली.

ADVERTISEMENT

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत शनिवारी गोव्यामध्ये होते. त्यांनी संध्याकाळी पणजीतील विराट सभेत गोव्यातील संघ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. याच कार्यक्रमात मूळचे भाजपचे नसलेले आमदारही स्वयंसेवकांच्या गणवेशात दिसून आले. यात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे पुत्र आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे, विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केलेले आणि सध्या पर्यटन मंत्री असणाऱ्या रोहन खंवटे आणि नुकतेच भाजपवासी झालेले मुरगावचे आमदार संकल्प अमोणकर यांचा समावेश होता.

सरसंघचालकांच्या राजकारण्यांना कान पिचक्या :

दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना संरसंघचालक मोहन भागवत यांनी राजकारण्यांवर निशाणा साधला. राजकीय हितापेक्षा समाजातील, तळागाळातील लोकांसाठी काम करा असा सल्ला दिला. तुम्ही राजकारणात किती प्रबळ झालात, शक्तिशाली झालात यापेक्षा तुम्ही तळागाळातील लोकांसाठी किती काम केले त्यांचा विकास केला हे महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले.

हे वाचलं का?

मोहन भागवत पुढे म्हणाले, भाजपला सत्तेची मूळ घट्ट करायची असली तरी त्यांनी इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना पक्षात सामावून घेताना शिस्त आणि प्रामाणिकपणाचे धडे द्यावे. त्यांना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिस्त लावा, त्याप्रमाणे काम करून घ्या असाही सल्ला त्यांनी आपल्या भाषणात दिला. दरम्यान, यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि इतरही अनेक भाजपमधील महत्वाचे नेचे, संघाचे स्वयंसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT