Russia Ukraine Crisis : कीवमध्ये रशियाकडून मिसाईल हल्ला; घटनेचा व्हिडीओ आला समोर
रशिया-युक्रेनमधील संघर्ष तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. शुक्रवारी रशियन लष्काराने युक्रेनची राजधानी कीवच्या सीमेवर धडक दिली होती. त्यानंतर आता दोन्ही देशात सुरू असलेल्या युद्धाचा ज्वर वाढला असून, कीवचा पाडाव करण्यासाठी रशियाने दोन मिसाईल डागल्या. त्यामुळे शहरात हाहाकार उडाला आहे. दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी देश सोडून न जाता रशियाशी लढणार असल्याची भूमिका घेतली आहे. रशियाकडून कीववर […]
ADVERTISEMENT

रशिया-युक्रेनमधील संघर्ष तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. शुक्रवारी रशियन लष्काराने युक्रेनची राजधानी कीवच्या सीमेवर धडक दिली होती. त्यानंतर आता दोन्ही देशात सुरू असलेल्या युद्धाचा ज्वर वाढला असून, कीवचा पाडाव करण्यासाठी रशियाने दोन मिसाईल डागल्या. त्यामुळे शहरात हाहाकार उडाला आहे. दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी देश सोडून न जाता रशियाशी लढणार असल्याची भूमिका घेतली आहे.
रशियाकडून कीववर ताबा मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. शनिवारी राजधानी कीवच्या दक्षिण-पश्चिम भागात रशियाने दोन मिसाईल हल्ले केले. कीवमध्ये अंदाधुंद गोळीबार सुरू असून, आकाशात रशियन लढाऊ विमानं घिरट्या घालताना दिसत आहे. त्यामुळे युक्रेनच्या नागरिकांमध्ये प्रचंड भीती वातावरण निर्माण झालं आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारासच गोळीबार सुरू झाल्यानं नागरिकांनी घरातून बाहेर पडून सुरक्षित ठिकाण आसरा घेतला आहे.
रशियाने कीवमध्ये दोन मिसाईल हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. कीवमधील स्थानिक प्रशासनाने याची माहिती दिली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीप्रमाणे रशियाने डागलेली मिसाईल नागरी वसाहतीतील बहुमजली इमारतीवर पडल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर आणखी एक मिसाईल राजधानीतील जुलियानी विमानतळावर कोसळली आहे. सध्या कीवमधील एका इमारतीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, मिसाईल हल्ल्यामुळे इमारतीचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे.
Russia attacks and kills civilians in Ukraine. Our army continues to defend our territory and every civilian. ?? resists and strives for peace. The world must stop Russian war criminals.#StandWithUkraine!
?Kyiv, Residential Area, building near Maternity Hospital and Schools. pic.twitter.com/JGNUQUGulX
— MFA of Ukraine ?? (@MFA_Ukraine) February 26, 2022
कीवमधील रहिवाशी इमारतील रशियाने डागलेली मिसाईल पडताना दिसत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. बीएनओ न्यूजने ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला असून, यात अचानक मिसाईल येऊन बहुमजली इमारतीवर कोसळते. त्यानंतर वीज कडाडल्यासारखा मोठा आवाज ऐकायला येत आहे. त्यानंतर धुराचे लोट आकाशाच्या दिशेने निघत असल्याचंही व्हिडीओतून दिसत आहे.










