Russia Terrorist Attack : सैन्य तळावर मोठा दहशतवादी हल्ला; ११ जणांचा मृत्यू, १५ जखमी
मॉस्को : रशियाच्या बेलगोरोड येथील सैन्य तळावर दहशतवादी हल्ला झाला असल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात रशियन सैन्याच्या ११ जवानांचा मृत्यू झाला आहे, तर १५ जण जखमी झाले आहेत. शनिवारी हा हल्ला झाला असल्याचे वृत्त आहे. एकीकडे रशिया-युक्रेन युद्धाची धग कायम असतानाच रशियावर हा मोठा आघात कोसळला आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सैन्याच्या सरावादरम्यान स्वयंसेवक […]
ADVERTISEMENT
मॉस्को : रशियाच्या बेलगोरोड येथील सैन्य तळावर दहशतवादी हल्ला झाला असल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात रशियन सैन्याच्या ११ जवानांचा मृत्यू झाला आहे, तर १५ जण जखमी झाले आहेत. शनिवारी हा हल्ला झाला असल्याचे वृत्त आहे. एकीकडे रशिया-युक्रेन युद्धाची धग कायम असतानाच रशियावर हा मोठा आघात कोसळला आहे.
ADVERTISEMENT
रशियन संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सैन्याच्या सरावादरम्यान स्वयंसेवक सैनिक बनून आलेल्या दोघांनी शनिवारी रशियाच्या सैन्य तळावर हल्ला केला. युक्रेनच्या सीमेजवळील नैऋत्य रशियाच्या बेलगोरोड भागातील सैन्य तळावर हा हल्ला झाला.रशियन संरक्षण मंत्रालयाने या घटनेची दहशतवादी हल्ला म्हणून नोंद केली आहे.
UPDATE | Russian officials say two volunteer soldiers opened fire at a military firing range near Ukraine, killing 11 and wounding 15 before they were killed. They said the volunteers were from an unnamed ex-Soviet nation, reports AP
— ANI (@ANI) October 15, 2022
रशियन संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, या दहशतवादी हल्ल्यात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 11 जवानांचा मृत्यू झाला तर, 15 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, सैन्यानेही दहशतवाद्यांवर प्रतिहल्ला चढवला. यात दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे.
हे वाचलं का?
हल्ल्यापूर्वी पुतीन यांनी दिला होता नाटोला इशारा :
दरम्यान, या हल्ल्याच्या पूर्वसंध्येला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादमिर पुतीन यांनी नाटोला इशारा दिला होता. रशिया-युक्रेनच्या युद्धात नाटो उतरल्यास मोठा विध्वंस होईल, असं ते म्हणाले होते. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा इशारा दिला होता. त्यानंतर हा हल्ला झाला आहे. त्यामुळे पुतीन यांच्या वक्तव्याचा आणि या हल्ल्याचा काही संबंध आहे का याचा तपास सुरु आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT