पुढच्या आठवड्यापासून भारतात मिळणार Sputnik V, जुलैपासून सुरू होणार उत्पादन
पुढच्या आठवड्यापासून भारतात Sputnik V ही रशियाची लस उपलब्ध होणार आहे. दोन बिलियन डोस पुढील पाच महिन्यांमध्ये उपलब्ध होणार आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. पुढच्या आठवड्यापासून Sputnik V या लसीची विक्री भारतात सुरू होणार आहे. तर ऑक्टोबर महिन्यापासून भारतात या लसीचं उत्पादित होऊन लस मिळू शकणार आहे. देशात कोरोनाचं संकट गहिरं […]
ADVERTISEMENT

पुढच्या आठवड्यापासून भारतात Sputnik V ही रशियाची लस उपलब्ध होणार आहे. दोन बिलियन डोस पुढील पाच महिन्यांमध्ये उपलब्ध होणार आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. पुढच्या आठवड्यापासून Sputnik V या लसीची विक्री भारतात सुरू होणार आहे. तर ऑक्टोबर महिन्यापासून भारतात या लसीचं उत्पादित होऊन लस मिळू शकणार आहे.
देशात कोरोनाचं संकट गहिरं झालं आहे. यासंदर्भात आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल, डॉ. बलराम भार्गव, आयसीएमआर आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल उपस्थित होते.
Sputnik Light : कोरोनाला रोखण्यासाठी नव्या लसीचा एक डोस पुरेसा, कंपनीची घोषणा
लव अग्रवाल यांनी काय सांगितलं?










