Saif Ali Khan Case : सैफ भिडला, हल्लेखोराला पकडलं, सुटणं अशक्य होतं, म्हणूनच... आरोपीने सगळं सांगितलं

मुंबई तक

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला सैफच्या वांद्रे येथील गुरु शरण अपार्टमेंटमध्ये नेले. तिथे पुन्हा क्राइम सिन तयार करण्यात आला होता. एकूणच या संपूर्ण चौकशीत आरोपीने सगळ्या गोष्टी सांगितल्या, ज्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. 

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

घरात कसा घुसला, सैफला का मारलं? आरोपीने सांगितलं

point

सैफच्या तावडीतून सुटणं अशक्य होतं... काय म्हणाला आरोपी?

point

क्राईम सिनवर पोलिसांना आरोपीने रकाय सांगितलं?

मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तपास करतेय. या प्रकरणात, रविवारी पोलिसांनी बांगलादेशी नागरिक शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद याला अटक केली. हा आरोपी विजय दास या नावाने मुंबईत बेकायदेशीरपणे राहत होता. मंगळवारी पोलिसांनी आरोपीला सैफच्या वांद्रे येथील गुरु शरण अपार्टमेंटमध्ये नेले. तिथे पुन्हा क्राइम सिन तयार करण्यात आला होता. एकूणच या संपूर्ण चौकशीत आरोपीने सगळ्या गोष्टी सांगितल्या, ज्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. 

1. सैफ अली खानच्या फ्लॅटमधून काय पुरावे सापडले?

पोलिसांना सैफ अली खानचा धाकटा मुलगा जेह याच्या खोलीतून आरोपी शहजादची टोपी सापडली. या टोपीमध्ये आरोपीचे केसही आढळले, जे डीएनए चाचणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळी भेट दिली. यावेळी, घटनास्थळी आरोपीच्या बोटांचे ठसेही आढळलेत. यामध्ये तो ज्या बाथरूमच्या खिडकीतून आत आणि बाहेर गेला त्याचीही तपासणी करण्यात आली. तसंच डक्टमध्ये प्रवेश करण्यासाठी वापरलेली शिडीही तपासण्यात आली.

2. आरोपी शहजादने सैफ अलीवर वार का केले?

हे ही वाचा >> पत्नीचे अश्लील फोटो काढले अन् मित्रालाच पाठवले, मित्राकडून महिलेकडे सेक्सची मागणी...

चौकशीदरम्यान, आरोपी शहजादने पोलिसांना सांगितलं की, सैफ अली खानने मला अडवलं आणि घट्ट पकडलं होतं, त्यातून सुटका करण्यासाठी त्याच्या पाठीवर अनेक वेळा चाकूने वार केले. तसंच या हल्ल्यानंतर तो त्यांच्या फ्लॅटमधून पळून गेला. यानंतर तो सुमारे दोन तास इमारतीच्या बागेत लपून राहिला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, "आरोपी चोरीच्या उद्देशानं बाथरूमच्या खिडकीतून सैफच्या सतगुरु शरण इमारतीतील फ्लॅटमध्ये घुसला. घरात प्रवेश केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याला पाहिलं."

3. आरोपी सैफच्या तावडीतून कसा सुटला?

आरोपीने घरात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर, आवाज ऐकून सैफ अली खान 12 व्या मजल्यावरून खाली आला. धोका लक्षात घेऊन सैफ आरोपीला भिडला आणि त्याला समोरून आरोपीला घट्ट पकडलं. सैफने पकडल्यानंतर आरोपीला हालताच आलं नाही, म्हणून त्याने सैफच्या तावडीतून सुटका करण्यासाठी त्यांच्या पाठीत चाकूने वार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला. यामुळेच आरोपी सैफच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp