Salman Khan: ‘मला शिव्या दिल्या, मारलं…’ Ex गर्लफ्रेंडचे गंभीर आरोप!
Bollywood: बॉलिवूडचा दबंग, भाईजान, चुलबुल पांडे या नावांनी ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सलमान खानची सर्वाधिक क्रेझ ही महिलांमध्ये आहे. सलमान खान नेहमीच त्याच्या पर्सनल लाईफ आणि लव्ह लाईफमुळेही चर्चेत असतो. त्याचे 90’s चे किस्से हे सर्वांनाच माहित आहेत. अशाच, एका पूर्वीच्या लव्ह अफेअरमुळे आता सलमान वादाच्या भोवऱ्यात […]
ADVERTISEMENT
Bollywood: बॉलिवूडचा दबंग, भाईजान, चुलबुल पांडे या नावांनी ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सलमान खानची सर्वाधिक क्रेझ ही महिलांमध्ये आहे. सलमान खान नेहमीच त्याच्या पर्सनल लाईफ आणि लव्ह लाईफमुळेही चर्चेत असतो. त्याचे 90’s चे किस्से हे सर्वांनाच माहित आहेत. अशाच, एका पूर्वीच्या लव्ह अफेअरमुळे आता सलमान वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ज्यामुळे सलमानच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ADVERTISEMENT
वाईट! युरोपीयन कमिशनने दिलेल्या तरंगत्या दवाखान्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष
सोमी अली कोण?
हे वाचलं का?
बॉलिवूडमध्ये जेव्हा-जेव्हा सोमी अलीबाबत चर्चा होते त्यावेळी सलमान खानची चर्चा ही होतेच होते. जेव्हा सलमान खानच्या गर्लफ्रेंड्सच्या उल्लेख होतो तेव्हा सोमी अलीचे नाव नक्कीच येते. सोमी अली ही मूळची पाकिस्तानची रहिवासी आहे. सोमी अलीला बॉलिवूडचे खूप आकर्षण होते. त्यामुळे ती मुंबईला वयाच्या 16व्या वर्षीच आली होती. त्यावेळी तिची ओळख ही सलमानसोबत झाली होती. भारतात तिने 6 वर्ष चित्रपटात काम केलं. काही दिवसांनी त्यांच्या ब्रेकअपची चर्चा होऊ लागली.
6 वर्षानंतर सोमी तिच्या आईसोबत अमेरिकेत स्थायिक झाली. पण आता सोमी अली ही इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
ADVERTISEMENT
इंस्टाग्राम पोस्टमध्ये सोमीने काय म्हटले?
ADVERTISEMENT
एक पोस्ट शेअर करत सोमी अलीने अभिनेता सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत. सोमी या पोस्टची सुरूवात ‘नो मोअर टीयर्स’ असे लिहून केली. तिने या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, तिने मानवी तस्करी आणि घरगुती हिंसाचाराला बळी पडणाऱ्यांसाठी ‘नो मोअर टीयर्स’ या एनजीओची सुरूवात केली आहे.
ती गेली 15 वर्ष या एनजीओसाठी काम करत आहे. डिस्कव्हरी प्लसवर याची एक डॉक्यूमेंट-सीरीज देखील दाखवण्यात आली होती. त्यानंतर सोमीने नो मोअर टियर्स हे एनजीओ सुरू करण्यामागचे कारण उघड केले.
‘नो मोअर टीयर्स’ एनजीओ सुरू करण्याचे कारण सोमीने सांगितले…
तिने सांगितले की, “ती स्वतः लहानपणी लैंगिक हिंसाचाराला बळी पडली होती. वयाच्या 5व्या वर्षी आपले शारीरिक शोषण झाल्याचे तिने सांगितले. यानंतर वयाच्या 9व्या वर्षी पाकिस्तानात घरात एका काम करणाऱ्या व्यक्तीने आणि वयाच्या 14व्या वर्षी अमेरिकेत एका व्यक्तीने तिचे शारीरिक शोषण केले होते. वयाच्या 16व्या वर्षी ती भारतात आली कारण तिला सलमान खानसोबत लग्न करायचे होते. हे तिने उघड केले.
पुढे ती म्हणाली की, ‘मी मुंबईत असताना सलमान खान मला शिवीगाळ आणि मारहाण करायचा. मी ज्यावेळी शूटिंगला जायची त्यावेळी माझे मेकअप आर्टिस्ट अजय शेलार माझे ते व्रण मेकअपने ठीक करायचे. ही कोणती ब्रेकिंग न्यूज नाहीये. सलमानने ज्या मुलींसोबत असे केले आहे त्यात मी एकटी नाहीये. पण बाकीच्यांचे मी नाव घेणार नाही. अनेकांनी एफआयआरही दाखल केला आहे. या बातम्या 90च्या दशकात ठळक बातम्यांचा भाग होत्या.” असे गंभीर आरोप सोमी अलीने सलमानवर या पोस्टमधून घेतले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT